Tarun Bharat

‘कबनूरच्या इनाम जमिनी रद्द कराव्यात’

वार्ताहर / कबनूर

शेतकऱ्यांची हक्काची जमीन बिगर शेती करताना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. जमिनी भोगवटदार एक करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार प्रकाश आवाडे व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली होती. याप्रकरणी माहिती घेऊन आपण हे काम मार्गी लावू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कबनूर गावच्या नागरीकांचा व शेतकऱ्यांचा इनाम रद्द करण्यासाठी जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयी तातडीची बैठक होऊन यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी कबनूर आतील शेत जमिनींच्या सातबारा उतार्‍यावर भोगवटदार वर्ग 1 असे नोंद असताना हातकणंगलेचे तत्कालीन तहसीलदार यांनी या गावातील जमिनी भोगवटदार 2 असल्याचा चुकीचा अभिप्राय दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जमीन बिगर शेती करताना नाहक उदंड सोसावा लागत आहे.

सध्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदार एक अशीच नोंद येते असे असताना तत्कालीन तहसीलदारांनी भोगवटदार 2 असा चुकीचा दाखला त्यामुळे हक्काच्या जमिनी बिगर शेती करताना शेतकऱ्यांना शासकीय मूल्यांकनाच्या 50 टक्के इतकी रक्कम भरून ती जमीन भोगवटदार 1अशी करून घ्यावी लागते हे करत असताना याचा फटका शेतकऱ्यांना व नागरिकांना बसत आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रकरणी लक्ष घालून याची माहिती घेऊन आपण हे काम मार्गी लावू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

Related Stories

महिला कर्जमुक्त झालीच पाहीजे!

Archana Banage

राधानगरी प्रांत प्रसेनजीत प्रधान लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

नगरपंचायतीसाठी राधानगरीकर एकवटले!, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

Archana Banage

ग्रामसभांमध्ये जलजीवन मिशन योजनेचा आढावा घ्या

Archana Banage

”शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव”

Archana Banage

Kolhapur; जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदगोंडा देवगोंडा पाटील य़ांचा राष्ट्रपती भवनाकडून सन्मान; प्रशासनाकडून अंमलबजावणी

Abhijeet Khandekar