Tarun Bharat

कबनूरात आणखी दोन बाधित

कबनूर / प्रतिनिधी

येथील कबनूर हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तिरंगा कॉलनी परिसरात एका 21 वर्षीय युवकासह दोघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

येथील बाजार कट्टा लगत असलेल्या परिसरातील एक 65 वर्षीय महिला शिये गावाला गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर इचलकंजी येथील आयजीएममध्ये तपासणीसाठी घेऊन गेले असता ही महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. तसेच तिरंगा कॉलनी गल्ली नंबर 5 मधील 21 वर्षीय युवकाने स्वतःहून आयजीएममध्ये तपासणी करून घेण्यासाठी गेले असता तो ही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. एकंदरीत गावातील एकूण कोरोना बाधित संख्या एकोणीस वर पोहोचली आहे. या दोन्ही भागांमध्ये रूग्ण आढळून आल्यानंतर कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही भाग सील करून कबनूर तिच्या तो भाग निर्जंतुकीकरण केला आहे.

Related Stories

Kolhapur; ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : विवाहितेच्या छळाबद्दल पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

केंद्राने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी : संजय राऊत

Archana Banage

ऑरेंज झोनमधील सवलतीसंदर्भात उद्या बैठक

Archana Banage

कोमल गोडसेंच्या निधनाने हळहळली सातारकरांची मने

Patil_p

कागल राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाका सुरु

Abhijeet Khandekar