Tarun Bharat

कबनूर येथे आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

कबनूर/प्रतिनिधी

येथील तिरंगा कॉलनी गल्ली नंबर 1 मध्ये भाड्याने राहत असलेल्या एका 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे . त्यामुळे कबनूर गावात खळबळ माजली आहे. पहिल्यांदाच कबनूर गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील तिरंगा कॉलनी गल्ली नंबर 1 मध्ये ही व्यक्ती भाड्याने राहत होती. तो डायलिसिससाठी चार जुलै रोजी मिरज येथील मिशन हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता. ही व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत खडबडून जागी झाली. त्या घरातील बाधित व्यक्तीचा मुलगा व त्याच्या बहिणीचा मुलगा असे दोन लहान मुलांना कबनूर हायस्कूल मधील असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार होते परंतु त्यातील एका मुलाचा घसा खवखवत असल्याने त्या दोन्ही मुलांना इचलकरंजी येथील आयजीएममध्ये दाखल करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी त्या भागांमध्येदाखल होऊन ताबडतोब औषध फवारणी केली. इचरकंजी शहरानजीक असलेल्या कबनूर गावातच प्रथमच कोरण्याचा शिरकाव झाल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

सातारा शहरात कडक टाळेबंदी

Patil_p

रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन ; पालकमंत्र्यांचा इशारा

Tousif Mujawar

सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणे हीच देशसेवा- डॉ. चेतन नरके

Abhijeet Khandekar

भास्कर जाधवांकडून महिलेला अरेरावी; संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

तीन बहिणींच्या मृत्यू प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

Patil_p

विद्यापीठाचा विद्यार्थी न्यायमुर्ती अभिमानास्पद गोष्ट

Kalyani Amanagi