Tarun Bharat

कमला कॉलेजला दहा वर्षासाठी स्वायत्तता; शिवाजी विद्यापीठाकडून पत्र प्राप्त

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ संलग्नित कमला कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्तता दर्जा मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाने या स्वायत्ततेला मान्यता दिल्याने विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्तता दर्जा मिळाल्याचे पत्र कमला कॉलेजला गुरूवारी पाठवले आहे. त्यामुळे कमला कॉलेजच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला आहे. स्वायत्तता दर्जा मिळाल्याने विविध कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यीनींना व्यावसायभिमुख शिक्षण दिले जाईल. परिणामी महाविद्यालयाची प्लेसमेंट वाढणार आहे.

ताराराणी विद्यापीठाची स्थापना 1945 साली कै. डॉ. व्ही. टी. पाटील यांनी केली आहे. या विद्यापीठासाठी कै. सरोजनीदेवी पाटील यांनी आपली संपूर्ण संपत्ती दिली आहे. या ताराराणी विद्यापीठाचा आता वटवृक्ष झाला असून केजी टू पीजीचे शिक्षण दिले जाते. ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी विविध अभ्यासक्रम सुरू करून यशाचा कळस चढवला आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तेच्या चढत्या आलेखाची दखल घेत विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी 2016 साली कॉलेजला ‘युईथ पोटेंशिअल फॉर एक्सलंस’ हा विशेष दर्जा दिला. 2017 साली नॅक बेंगलोर यांनी केलेल्या नॅक मूल्यांकनात 3.12 सीजीपीएसह ‘ए’ ग्रेड प्राप्त झाली आहे. मार्च 2021 मध्ये युजीसीला स्वायत्ततेसाठी प्रस्ताव सादर केला होता. युजीसीच्या पाच सदस्यीय कमिटीने 30 व 31 ऑक्टोबर रोजी कॉलेजची पाहणी केली. अभ्यासक्रम, प्राथमिक सोयी-सुविधांची पाहणी, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून समाधान व्यक्त केले. या कमिटीने युजीसीच्या स्टँडींग कमिटीला स्वायत्तता देण्याची शिफारस केली.

या शिफारसीनुसार युजीसीने 2022-23 पासून 2031-32 पर्यंत स्वायत्तता दिली आहे. युजीसीने दिलेल्या स्वायत्ततेचा प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाने अधिकार मंडळासमोर मांडला. या प्रस्तावाला सर्व अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे. महाविद्यालयाला दहा वर्षासाठी स्वायत्तता दिल्याचे पत्र विद्यापीठाने कमला कॉलेजला गुरूवारी पाठवले आहे. कॉलेजमध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स , बी. व्होक. रिटेल, बी. व्होक. फुड., एम. ए. इंग्लिश, एम. ए. होमसायन्स, पी. जी. डिप्लोमा इन योगा, एम. ए. योगा, 7 सर्टीफिकेट कोर्स, बीसीए आदी अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. स्वायत्तता मिळाल्याने आता प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतचे सर्व कामकाज कमला कॉलेजमध्येच होईल. तसेच भविष्यात व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थीनींना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवले जाईल. स्वायत्तता दर्जा मिळण्यासाठी कार्याध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्रा. अनघा पाठक, प्रा. रेखा पंडीत, डॉ. अनिल घस्ते, डॉ. सुजय पाटील, लेखनिक प्रताप रंगापुरे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थीनींचे सहकार्य लाभले.

Related Stories

‘मला माफ करा, मी हरलो… : जितेंद्र आव्हाड यांचे भावनिक ट्विट

prashant_c

उचगांव येथील ५२ वर्षीय कोरोना बाधित शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

Archana Banage

मराठा जातीचे ओबीसीकरण नको

Archana Banage

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील

Tousif Mujawar

कापूस दरवाडीसाठी अनिल देशमुखांचं पियुष गोयलांना पत्र

Archana Banage

हातकलंगलेमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage