Tarun Bharat

कमल हासनसोबत झळकणार दीपिका

Advertisements

काजल अग्रवालच्या जागी निवड

दाक्षिणात्य चित्रपटांची जादू अद्याप कायम आहे. अल्लू अर्जुनपासून यश, महेश बाबू आणि कमल हासन या सर्वांनी हिंदीभाषिक प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केले आहे. याचमुळे बॉलिवूड कलाकारांचा ओढा आता दाक्षिणात्य चित्रपटांच्या दिशेने वाढतोय. ‘विक्रम’द्वारे मोठय़ा पडद्यावर जोरदार पुनरागमन केल्यावर कमल हासन यांनी नव्या चित्रपटाच्या कामास सुरुवात केली आहे. कमल आता ‘इंडियन’चा सीक्वेल ‘इंडियन 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दिग्दर्शक एस. शंकर यांच्या या चित्रपटात कमल हासन यांच्यासोबत अभिनेत्री काजल अग्रवालची निवड करण्यात आली होती. परंतु आता यात बदल करण्यात आला आहे. ‘इंडियन 2’ चित्रपटात दीपिका पदूकोनची वर्णी लागणार आहे. लाइका प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱया या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दीपिकाशी संपर्क साधला आहे.

Related Stories

भारतात वास्तव्यासाठी परतणार श्रिया सरन

Amit Kulkarni

केजीएफ 2 प्रदर्शनावेळी राष्ट्रीय सुटी द्या!

Patil_p

दख्खनचा राजा ज्योतिबा लवकरच येणार भेटीला

Patil_p

रजनीकांत यांचा हटके विक्रम…

Patil_p

‘लिटिल चॅम्प्सना’ छोटय़ा वादकांची साथ

Patil_p

‘नखरेवाली’ होणार सारा अली खान

Patil_p
error: Content is protected !!