Tarun Bharat

कमल हासन यांना कोरोनाची लागण

अद्याप संपलेली नाही महामारी -रुग्णालयात आयसोलेट दिग्गज अभिनेता

वृत्तसंस्था  / चेन्नई

मक्कल नीधि मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेतून परतल्यावर त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. चाचणीत कोरोना संक्रमणाची पुष्टी झाल्याने त्यांनी रुग्णालयात स्वतःला आयसोलेट केले आहे. कोरोना महामारी अद्याप संपलेली नसल्याने सर्वांनी सावध रहावे, असे कमल हासन यांनी तमिळ भाषेत ट्विट करत म्हटले आहे.

अमेरिकेच्या दौऱयादरम्यान कमल हासन यांनी 15 नोव्हेंबर रोजी शिकागो येथील समर्थकांसोबत चर्चा केली होती. कमल हासन काही दिवसांपूर्वी भारतात परतले होते. तर विदेश दौऱयापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांना भेट दिली होती. तसेच पीडित लोकांना पक्षाच्या वतीने मदत केली होती.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 9888 वर

Tousif Mujawar

मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केले सर्वात महागडे घर

Patil_p

अर्थव्यवस्थेसाठी शुभवार्ता, पहिल्या तिमाहीत जीडीपीवाढ 13.5 टक्के

Patil_p

नक्षलवाद्यांच्या तावडीतून सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांची सुटका

Tousif Mujawar

केंद्रातून भाजपला हटवेपर्यंत ‘खेला होबे’

Patil_p

व्हिडिओ गेमच्या पात्रांचा विक्रमी संग्रह

Patil_p