Tarun Bharat

‘कमळ थाळी’चा ओरोसमध्ये शुभारंभ

कामगारांसह, गरजू लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जि. प. पदाधिकाऱयांनी आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्यानंतर जि. प. पदाधिकाऱयांनी भाजपतर्फे ओरोसमध्ये ‘कमळ थाळी’चा शुक्रवारपासून शुभारंभ केला. यावेळी अनेक मजूर व गरजू लोकांनी थाळीचा लाभ घेतला. जिल्हय़ात सर्व व्यवहार सुरक्षित होईपर्यंत कमळ थाळी सुरू राहणार असून कामगारांबरोबरच जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त येणारे लोक, कर्मचारी व गरजू लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जि. प. अध्यक्षा समिधा नाईक व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून येथे कमळ थाळी सुरू केल्यानंतर जि. प. पदाधिकाऱयांनीही सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील गोविंद मंगल कार्यालयात मोफत थाळीचा शुभारंभ जि.प.अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते केला. यावेळी जिल्हाध्यक्ष तेली, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जि.प.सदस्या मनस्वी घारे, सुधीर नकाशे, नगरसेविका संध्या तेरसे, विनायक राणे, मानसी धुरी, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर, अमोल मालवणकर, सुभाष सावंत उपस्थित होते.

 यावेळी अध्यक्षा सुमेधा नाईक व उपाध्यक्ष म्हापसेकर म्हणाले की, ‘कोरोना’ संकटामुळे उद्भवलेली परिस्थिती सुरळीत होईपर्यंत दुपारी 12 ते 2 या वेळेत दररोज मोफत कमळ थाळी दिली जाणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी येणारे कर्मचारी व या भागातील गरजू लोकांसाठी कमळ थाळी जि. प. पदाधिकारी व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यासाठी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

Archana Banage

चाळीस बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी!

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत मच्छिमारांचे साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Archana Banage

ओरोस ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

mithun mane

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कमलेश कोचरेकर यांची प्रकृती खालावली

Anuja Kudatarkar

लोटेतील कामगारांसाठी आजपासून एस्.टी.धावणार!

Patil_p