Tarun Bharat

कमी तापात अँटीबायोटिक्स घेऊ नका

आयसीएमआरकडून नव्या मार्गदर्शक सूचना ः केवळ गरजेच्या वेळी व्हावा वापर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सर्वसाधारणपणे अँटीबायोटिक्सचा वापर बॅक्टेरियल इंफेक्शनशी (जिवाणू संसर्ग) लढण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी केला जातो, परंतु बहुतांश लोक अँटीबायोटिकचा वापर ताप, खोकला अशा कारणांसाठीही करू लागतात. यामुळे अँटीबायोटिक्सचा अत्यंत प्रतिकूल प्रभाव शरीरात दिसून येऊ शकतो. वैद्यकीय यंत्रणा सातत्याने अँटीबायोटिकच्या वापरावरून इशारा देत असतात, तरीही लोक अँटीबायोटिक गोळय़ा कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेत असतात. यामुळे अँटीबायोटिकची जेव्हा खरोखरच गरज असते, तेव्हा ते निष्प्रभ ठरू लागते. हे लक्षात घेत भारतीय चिकित्सा अन् संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कमी तापात कुठल्याही स्थितीत अँटीबायोटिक औषधांची सूचना करू नये असे डॉक्टरांना सांगण्यात आले आहे.

नव्या मार्गदर्शक सूचना ‘ट्रीटमेंट गाइडलाइन्स फॉर अँटीमायक्रोबियल यूज इन कॉमन सिंड्रोम’ 2017 मध्ये तयार करण्यात आलेल्या नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंसचे संशोधित स्वरुप आहे. याचे दुसरे संशोधित स्वरुप 2019 मध्ये सादर करण्यात आले होते, यात बोन अन् जॉइंट इंफेक्शन, स्कीन आणि सॉफ्ट टिश्यू तसेच सेंट्रल नर्व्हस सिस्टीम इंफेक्शनविषयी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या. नव्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंसचे मापदंड अधिक कठोर करणे आहे. अँटीबायोटिक्सचा योग्य वापर बॅक्टेरियल इंफेक्शनमध्ये होतो, परंतु अन्य प्रकारच्या इंफेक्शनमध्ये याचा वापर केल्याने शरीरातील गूड बॅक्टेरिया मरू लागतात. यामुळे आजारास कारणीभूत ठरणाऱया बॅक्टेरियांना संरक्षण प्राप्त होत ते अँटीबायोटिक्सना दाद देत नाहीत.

आयसीएमआरचा इशारा

आयसीएमआरच्या डाटानुसार प्रत्येक वर्षी सुमारे 20 लाख इंफेक्शनचे रुग्ण आढळून येतात. यातील 23 हजार जणांचा मृत्यू होतो. नॅशनल ऍक्शन प्लॅन-अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंसला जागतिक ऍक्शन प्लॅन अंतर्गत तयार करण्याचा उद्देश आहे. कोरोना महामारीमुळे अँटीमायक्रोबियल औषधांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक सूचना सादर करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोरोनांतर अनेक महत्त्वपूर्ण अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधे निष्प्रभ ठरू लागली आहेत. याचमुळे अँटीबायोटिकचा वापर गरजेशिवाय कुठल्याही स्थितीत होऊ नये असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

औषध निष्प्रभ ठरण्याचा प्रकार

आयसीएमआरच्या एका अध्ययनात धक्कादायक बाब समोर आली आहे. 2021 मध्ये आयसीयूत न्युमोनियाच्या उपचारात वापरल्या जाणारे औषध निष्प्रभ ठरण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे या आजाराचा उपचार मर्यादित झाला आहे. या सर्व स्थिती विचारात घेत अँटीबायोटिकच्या वापराबद्दल मार्गदर्शक सूचना  जारी करणे अत्यंत गरजेचे ठरले होते.

Related Stories

“पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का?”, चंद्रशेखर राव यांचा सवाल!

Archana Banage

काँग्रेस नेत्याची बेताल बडबड

Patil_p

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पुन्हा झळकणार मोदींचा फोटो

datta jadhav

बीआरएसचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर

Patil_p

उमेश कत्तींना विधानसभेत श्रद्धांजली

Patil_p

मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप बंद

Patil_p