रियलमी, शाओमीसह अन्य कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन बाजारात दिवसागणिक विविध मॉडेल्स सादर होत आहेत. यामध्ये ग्राहकांचा खरेदीचा कलही बदलत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांसह अन्य ग्राहक हे कमी बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. सध्या 15,000 पेक्षा कमी किमतीच्यह स्मार्टफोनमध्ये रियलमी, वीवो, शाओमी, इनफिनिक्ससह मोटो या कंपन्यांचा समावेश आहे. या स्मार्टफोन बाबतच आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विवो टी1 5जी ः
विवो टी1 5 जी स्मार्टफोन 4 जीबी व 128 जीबी स्टोरेजसोबत मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये फ्लिपकार्टवर हा जर फोन खरेदी केला तर 20 टक्के सवलत मिळणार आहे. 15,990 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सदरचा स्मार्टफोन 5,000एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध होणार आहे.


रियलमी9 आय ः
रियलमी 9आय मॉडेल हे 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज मॉडेल ग्राहकांना 13,639 रुपयांमध्ये उपलब्ध होणार असून हा सवलतीच्या दरातही उपलब्ध होणार आहे. यामध्ये कंपनी 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 6.6 पूर्ण एचडी डिस्प्लेसह अँड्रॉइड 11ओएस वर आधारीत ऑक्टोकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 689 प्रोसेसर मिळणार आहे.
इनफिनिक्स हॉट11(2022)
सदरचा स्मार्टफोन हा 4 जीबी व 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळणार आहे. सदरच्या मॉडेलला 6.7 इंच पूर्ण एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले राहणार आहे. याची किमत 9,499 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. एक ऑक्टा कोर युनीसोक टी610 आणि जी52 जीपीयू सपोर्ट मिळणार आहे. 10 व्हाल्ट फास्ट चार्जिंग सुविधांही राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मोटो जी40 फ्यूजन ः
मोटोजी 40 फ्यूजनच्या खरेदीवर साधारण 14 टक्के सवलत मिळणार आहे. यामध्ये सदरचे मॉडेल हे 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसोबत राहणार आहे. यासोबतच सदरचा स्मार्टफोन हा 12,500 रुपयावर एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येणार आहे. या मॉडेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 732 जी सपोर्ट मिळणार आहे. या फोनला 6,000एमएएच इतक्या क्षमतेची बॅटरी राहणार आहे.
रेडमी नोट 10 एस ः
रेडमी नोट10 एस स्मार्टफोन हा 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह बाजारात सादर करण्यात आला असून हा फोन 13,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरवर मिळणार आहे. रेडमी नोट 10 एस स्मार्टफोन अँड्रॉईड 11 बेस्ड एमआययूआय 12.5 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे. 6.43 इंचाचा पूर्ण एच प्लस एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.