Tarun Bharat

करंजगावचा जवान आसाममध्ये हुतात्मा

प्रतिनिधी / चंदगड

चंदगड तालुक्यातील करंजगावचे सुपुत्र जवान नितेश महादेव मुळीक (वय 28) हे आसाम येथे सेवा बजावत असताना हुतात्मा झाले. यामुळे करंजगावसह अवघ्या चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता लष्करी इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नितेश महादेव मुळीक यांना बालपणापासूनच देशसेवेची आवड होती. वडीलही निवृत्त सैनिक असल्याने आपणही सैन्यातच असावे, असे त्यांना वाटत होते. कोणत्याही परिस्थितीत सैन्यदलात सामील होण्याच्या उद्देशाने त्यांनी तयारी केली होती. बारावीनंतर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रूजू झाले होते.

गेल्यावर्षी एप्रिलमध्येच त्यांचा विवाह झाला होता. त्यांची सासरवाडी दाटे येथे आहे. त्यांची पत्नी सहा महिन्यांची गरोदर असून महिन्यापूर्वीच सुटी संपवून आसामला कर्तव्यावर गेले होते.

गेल्या सुटीत उभयतांनी बाळाची गोड स्वप्ने पाहिली होती. परंतु नियतीला हे मान्य नसावे. देशसेवा बजावत असताना आसामध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजता नितेश मुळीक हुतात्मा झाले. या घटनेची माहिती लष्करी अधिकाऱयांनी नितेशचे वडील महादेव मुळीक यांना देताच मुळीक कुटुंबीय हादरले. गावही शोकसागरात बुडाले.

पार्थिव शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता करंजगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.  मुळीक यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Stories

गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठ फुलली!

Amit Kulkarni

कोरे, जेड गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

नृत्यकला क्षेत्रात झळकतेय मच्छे गावची कन्या

Amit Kulkarni

‘त्या’ कुटुंबीयांना संरक्षण द्या

Amit Kulkarni

सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन आता नववर्षातच

Patil_p

शाहूनगर येथील योगवर्गाचा वर्धापन दिन

Amit Kulkarni