Tarun Bharat

करण जोहरची ही कला परिणितीला झाली असह्य

हुनरबाजच्या स्टेजवर उडाले हास्याचे फवारे

ऑनलाईन टिम / मुंबई

नव्या वर्षात छोट्या पडद्यावर आलेल्या हुनर बाज देश की शान या टॅलेंट बेस्ड शोने तीन महिन्यात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. देशभरातून आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी या मंचावर स्पर्धक येत असतात आणि ते आपल्या कलाकारीने भरपूर मनोरंजनही करत असतात. कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया ही जोडी हा शो होस्ट करत असल्याने मनोरंजनाची नुसती बरसात होत असते. या शोमध्ये येणारे स्पर्धक एकाहून एक टॅलेंट दाखवत परीक्षकांनाही मनोरंजनाची पर्वणी देतात. स्पर्धकांच्या टॅलेंटने कधी परीक्षक अवाक् होतात. हैराण होतात तर कधी स्पर्धकांची डोक्यात जाणारी कला मध्येच थांबवून त्याला टाटा बाय-बाय देखील करतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये या शोच्या जजेस पैकी एक असलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्रा( Pariniti Chopra) हिला चक्क कानावर हात ठेवण्याची वेळ आली. स्टेजवर असं काय घडलं की परीणिती तोबा तोबा म्हणत तुझं गाणं आवर असं म्हणाली ? या शोचा जज असलेल्या करण जोहर याने गायलेल्या गाण्यामुळेच खरेतर परीणितीला तिचे कान बंद करावे लागले. करण जोहरने गाणं थांबवलं तरी पुढचा काही वेळ स्टेजवर फक्त हास्याचे फवारे उडत होते.

हुनरबाज देश की शान (Hunnarbaz) या शोच्या दोन एप्रिलच्या भागात ही धमाल-मस्ती झाली. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या टॅलेंटचे परीक्षण अभिनेत्री परिणीती चोप्रा, निर्माता दिग्दर्शक करण जोहर(Karan_Johar) आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun_Chakravati) हे करत आहेत. गुढीपाडव्याच्या स्पेशल भागात या शोमध्ये गायिका नेहा भसीन, कोरिओग्राफर सनम जोहर आणि शास्त्रीय संगीतकार पंडित तौफिक कुरेशी हे खास पाहुणे म्हणून आले होते. आता खास पाहुणे आलेत म्हटल्यानंतर त्यांचा ही परफॉर्मन्स होणारच. मग काय गायिका नेहा भसीन हिने एक स्पेशल गाणं या मंचावर सादर केले. नेहाच्या गाण्यावर तर टाळ्यांचा कडकडाट झाला पण नेहाच्या गाण्याला धरूनच मिथुन चक्रवर्ती याने करण जोहर याला गाणं गायची फर्माईश केली. आता पडद्यामागे राहून सेलिब्रिटींना आपल्या दिग्दर्शनाच्या तालावर नाच वणाऱ्या करण जोहर याचे गळ्यातले सुर कसे आहेत हे फक्त त्यालाच माहीत होतं. त्यामुळे तो मिथुनच्या या विनंतीवर असं म्हणाला देखील की खरोखर तुम्ही इतका आग्रह करताय म्हणून मी गातो पण माझे सूर असे काही लागतील की नेहा भसीनला सुद्धा क्षणभर वाटेल की आपण गायिका झालो नसतो तर बरं झालं असतं. अर्थात हा गमतीचा भाग होता. त्यानंतर मिथुनदांची फर्माईश स्वीकारत करण जोहर याने शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यावर येस बॉस या सिनेमात चित्रित झालेलं एक दिन आप यु हमको मिल जाओगे या गाण्यावर सूर लावले. गाणं सुरू करण्यापूर्वी हे गाणं आपण नेहाला डेडीकेट करत असल्याचंही सांगितलं. गाण्याच्या एकेक ओळी जसा जसा करण गाऊ लागला तसे मात्र जजच्या खुर्चीवर बसलेल्या परिणीतीचे हात तिच्या कानांवर गेले आणि तिच्या ओठातुन तोबा तोबा असे शब्द बाहेर आले. इकडे स्टेजवर उभी असलेल्या नेहा भसीन हिला तर हसू आवरेनासे झाले. करणचं गाणं सुरू असतानाच सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या पंडित तौशिक कुरेशी यांच्याकडे. परीणिती पंडीत कुरेशी यांना म्हणाली की करण सुरांच्या जवळपास आहे ना ? त्यावर कुरेशी यांनी ही, हो हो करण सुरांच्या जवळ थोडासा पोचला आहे. त्यावर परिणितीला राहवले नाही आणि ती म्हणाली, हो लंडन आणि गोरेगाव यांच्यात जितकं अंतर आहे ना तितका जवळ करण सुरांच्या जवळ पोहोचला आहे . यावर टिप्पणी सुरू असताना भारती आणि हर्ष यांनीही आपल्या निवेदनाचा फटकार चौकार लगावला होता. एकूणच काय तर स्टेजवर करण जोहरने दाखवलेल्या या टॅलेंटने परिक्षक, स्पर्धक आणि प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं.

Related Stories

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार?; राजभवनाने दिलं स्पष्टीकरण

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 1408 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाचा छापा

datta jadhav

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

datta jadhav

मोठी बातमी : दहावीची परीक्षा रद्द, तर बारावी परीक्षा होणार

Archana Banage

धक्कादायक : ठाण्यात एकाच महिलेला एकाच वेळी तीन डोस 

Tousif Mujawar