ऑनलाईन टीम / मुंबई :
दिग्दर्शक निर्माता करण जोहरने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. हे पत्र मोदींना टॅग करत त्याने एक नोट शेअर केली आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सिनेसृष्टी एक आनंद साजरा करू इच्छिते. भारताची विरता, भारताची मुल्ये आणि संस्कृतीवर कंटेट तयार करण्याचा मानस आहे.


करणने ट्विट करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला अभिमान आहे की, जेव्हा स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे केले जाणार आहे, तेव्हा आम्ही या महान देशावर कथा सांगणार आहोत. नोटमध्ये करण ने पुढे म्हटले की, Change Within मोहिम अंतर्गत सिनेसृष्टी एकत्र येऊन काही वेगळ्या गोष्टी करू इच्छिते. यामध्ये अशा कथा आहेत, ज्यामध्ये देशाची संस्कृती, देशाचे शौर्य दाखवले जाईल.


करणने आपल्या या पत्रात राजकुमार हिरानी, एकता कपूर, आनंद एल राय, साजिद नाडियाडवाला, रोहित शेट्टी आणि दिनेश विजन यांना देखील टॅग केले आहे.