Tarun Bharat

करमाळा नगपरिषदेच्या वतीने” माझे कुंटूब माझी जबाबदारी” अंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धा

प्रतिनिधी / करमाळा

महाराष्ट्र शासनाकडून कोवीड – 19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणून माझे कुंटूंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु आहे. 

या मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेकडून शहरांमध्ये प्रत्येक कुंटूबाचे आरोग्य तपासणी सुरु आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, या पलीकेडे जावून वैयक्तीक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्वीकार करुन नवीन जीवन शैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकअधिक व्यक्तींना प्रेरित करुन प्रभावी आरोग्य शिक्षण साधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. अशा बदलांचा स्वीकार करुन नवीन जीवन शैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकअधिक व्यक्तींना प्रेरित करुन प्रभावी आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी मा.वैभवराजे जगातप, नगराध्यक्ष करमाळा नगरपरिषद यांचे प्रेरणेतून व मार्गदर्शनानुसार नगरपरिषदेकडून कोरोना विरुध्द जनजागृतीपर निबंध व व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि.30 सप्टेंबर  रोजी केले आहे.

सदर स्पर्धेचा विषय कोरोनावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी,  कोरोना प्रतिबःध उपाय कोरोना झाल्यावर घेयची काळजी व कोरोना होऊन गैल्यावर घ्यायची कावजी, मला समजलेला व मी आनुभवलेला कोरोना असा आहे. सदर वक्तृत्व व निंबध स्पर्धा नागरिक, शिक्षक, डॉक्टर या तीन गटांसाठी असून  प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात येईल. सदर निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा जास्तीत जास्त अडीशे शब्द राहील. वक्तृत्व स्पर्धेसाठी कालमर्यादा दहा मिनिट असेल. या करिता प्रथम क्रमांक 1 हजार  रु.बक्षिस,व्दितीय क्रमांक सातशे  रु.बक्षिस, तृतीय क्रमांक पाचशे- रु. बक्षिस असे प्रत्येक स्पर्धेसाठी असेल. जनजागृतीचा भाग म्हणून करमाळा नगरपरिषदेकडून कोरोना विरुध्द जनजागृतीपर निबंध व व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि.30 सप्टेंबर  रोजी केले आहे.

सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  श्रीमती स्वाती जाधव,मो.नं.7387908395, कु.आश्विनी पाटील, मो.नं.7387908395, श्री.तुषार टांकसाळे, मो.नं.9960236571,  श्री.गणेश शिंदे, मो.नं.83083630945 यांना संपर्क साधून दि.29 सप्टेंबर  पर्यंत नाव नोंदणी करुन घ्यावी. आयोजन केलेल्या स्पर्धेचे परिक्षण दि.30 सप्टेंबर  रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असल्याचे साांगितले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी न.पा.च्या वतीने जनजागृतीकरिता आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा.

Related Stories

माढा : भोसरेत तीघांना कोरोनाची लागण

Archana Banage

सोलापूर : ट्रकच्या धडकेत चपळगावचा तरुण ठार, एक गंभीर जखमी

Archana Banage

सोलापूर : करमाळा शहरासह तालुक्यात आज ५६ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Archana Banage

बार्शी तालुक्यातील शेलगाव(मा) हद्दीतील ओढ्यावरील बंधारा गेला वाहून

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात आज 28 मृत्यू, 965 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage