Tarun Bharat

करमाळेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / करमाळे

करमाळे ता. शिराळा येथील शेतकरी मधुकर यादव यांच्या गाभण शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीच्या मृत्यू झाला. यामुळे त्यांचे अदांजे १२ ते १५ हजाराचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री ९.४५ ला करमाळे येथील यादव मळ्यात मधुकर यादव यांचे घर आहे.

घराशेजारीच असलेल्या शेडमध्ये शेळी बांधली होती. रात्री अचानक वासरू ओरडल्याने ते घरातून बाहेर आले असता बिबट्या शेळीच्या अंगावर बसला होता व गळ्याजवळ पकडून ठेवले होते. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. काही वेळाने शेळी मृत्यूमुखी पडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

रिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या

Archana Banage

सांगली : वाङ्मय प्रकल्प समितीवर प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

Archana Banage

सांगली : विषयपत्र १० लाखांचे ठराव मात्र सव्वा दोन कोटींचा

Archana Banage

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात नवे 451 रुग्ण, तर 599 कोरोनामुक्त

Archana Banage

पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांची बदली

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!