Tarun Bharat

करमाळ्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा आराखडा जाहीर

Advertisements

करमाळा :  प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा आराखडा जाहीर झाला आहे. शुक्रवारी (ता. २५) हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंजूर झाला असून त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. नव्याने स्थापन झालेल्या चार ग्रामपंचायतीचाही यामध्ये समावेश आहे.

करमाळा तालुक्यातील मुदत संपलेल्या व नवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ३१ जानेवारीपासून हा प्रारूप प्रभाग निश्चित कार्यक्रम सुरू होता. याबाबत तहसीलदार समीर माने यांनी करमाळा तालुक्यातील संबंधितांना आदेश दिले होते. त्यानुसार ही प्रभाग रचना करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यात वांगी १, वांगी २, वांगी ३ व भिवरवाडी व वांगी ४ या ग्रामपंचायती नवीन स्थापन झाल्या आहेत. याशिवाय जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधी मुदत संपणाऱ्या ३४ ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये सातोली, बिटरगाव वां, आवाटी, वडशिवणे, देलवडी, कोंढारचिंचोली, दिव्हेगव्हाण, पोफळज, जिंती, कामोणे, पारेवाडी, भिलारवाडी, सोगाव, रिटेवाडी, गोयेगाव, पोमलवाडी, वाशिंबे, हिंगणी, कुंभारगाव, दहिगाव, तरटगाव, खडकी, खातगाव, टाकळी रा., कात्रज, लिंबेवाडी, मोरवड, वंजारवाडी, अंजनडोह, पौंधवडी, वरकटणे, विहाळ, शेलगाव वां. व मांजरगाव या ग्रामनपंचायतीचा समावेश आहे.

नकाशा अंतिम झाल्यानंतर संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांनी ४ फेब्रुवारीपासून प्रभागाची संयुक्त पाहणी केली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत अंतिम मंजुरीसाठी प्रभागरचना आराखडा जिल्हाधिकारी यांच्या समोर सादर झाला होता. अंतर्गत दुरुस्तीनंतर जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिली. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत.
३ मार्चपर्यंत यावर हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे. ७ मार्चला यावर उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर यावरील हरकतींवर सुनावणी होणार आहे. हरकती आणि सूचना यावर अभिप्राय नोंदवून व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे, अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.

Related Stories

उत्तम कलेला मरण नाही : राज ठाकरे

prashant_c

सोलापूर ग्रामीण भागाला दिलासा

Abhijeet Shinde

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन

Patil_p

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा न्याय का ? ; जितेंद्र आव्हाडांवर भाजपची टीका

Abhijeet Shinde

राष्ट्रपुरुषांचे फोटो हटवून भाजप नेत्यांचे फोटो? आरटीओ कार्यालयात शिवसेनेचं आंदोलन

Abhijeet Khandekar

अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!