Tarun Bharat

करमाळ्यात लॉकडाऊनमधील निर्बंध काही प्रमाणात शिथिल

Advertisements

करमाळा / प्रतिनिधी

करमाळा शहरातील लॉकडाऊन निर्बंध काही प्रमाणात आज पासून शिथिल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार दिनांक 1 जून ते 15 जून 2021 या कालावधी करता कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधा मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये सर्व किराणा दुकाने, भाजीपाला ,फळांची दुकाने, डेअरी, बेकरी ,कन्फेक्शनरी आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी यांच्यासह) पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी 7:00 ते 11:00 पर्यंत चालू राहतील. कृषी निगडित सेवा व अस्थापना सकाळी 7:00 ते 2:00 पर्यंत चालू राहतील.

सार्वजनिक वाहतुकीचा परवानगी असेल. खाजगी वाहतूक फक्त आवश्यक सेवा तसेच वैद्य काढण्यासाठी वाहन चालक व प्रवासी आसन क्षमतेच्या 50% इतक्या क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी आहे. हॉटेल ,रेस्टॉरंट , बार हे पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल रेस्टॉरंट मध्ये फक्त होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा यांना परवानगी राहील. तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सकाळी 7:00 ते रात्री 8:00 या वेळेत पार्सल सेवा व घरपोच सेवा देता येईल नागरिकांना रस्त्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देता येणार नाही. करमणूक ,मनोरंजन ठिकाणी, मॉल ,शॉपिंग सेंटर, केस कर्तनालय, स्पा, ब्युटीपार्लरची दुकाने बंद राहतील. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. विवाह सोहळा 25 व्यक्तींच्या तर अंत्यविधी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडावे लागतील.

शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवाव्या. व्यक्ती किंवा अस्थापना यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Stories

सुस्ते येथे बेकायदेशीररित्या अफुच्या शेतीची लागवड

Sumit Tambekar

बार्शीत मद्यपींचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे कल

Abhijeet Shinde

सोलापूर : कुर्डुवाडीत गुरुवारपासून तीन दिवस सर्व व्यवहार बंद

Abhijeet Shinde

पबजी गेमच्या नादात गमावला जीव

prashant_c

सोलापूर शहरात 68 कोरोना पॉझिटिव्ह, दोन मृत्यू

Abhijeet Shinde

जिल्हा विकास आराखड्यासाठी उस्मानाबादला 285 कोटींचा निधी मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!