Tarun Bharat

करवीर मतदार संघ राज्यात विकासाचे आदर्श मॉडेल बनवू – आमदार पी. एन. पाटील

सांगरूळ / प्रतिनिधी

करवीर विधानसभा मतदार संघातील जनतेने ज्या विश्वासाने मला करवीर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी करून आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी करवीर विधानसभा मतदारसंघ राज्यात विकासाचे आदर्श मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही करवीरचे आमदार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पी .एन पाटील – सडोलीकर यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज एक वर्ष पूर्ण झाले या पार्श्वभूमीवर दैनिक तरुण भारतच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात सांगरूळ मतदारसंघात पाच वर्षात प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यत विकास निधी पोहचवून विकासाला गती दिली होती.करवीरमध्ये प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यत निधी पोहचवून विकासाचे नवे पर्व सुरू करूया ! चाळीस वर्षाच्या सार्वजनिक व राजकीय वाटचालीत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊन विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला असून मतदारसंघातील जनतेचीही लाख मोलाची साथ ही महत्त्वाची आहे.

करवीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून राज्यात विकासाचे एक आदर्श मॉडेल साकार करण्याचा मानस असून यासाठी आपल्या सर्वाच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वर्षभरातील बहुतांशी वेळ वाया गेला आहे.मार्चपासून आजपर्यंत आपण कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहोत. या संकटकाळात मतदारसंघात सॅनिटायझरसह विविध औषधांचे वाटप केले आहे. हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राला अँब्युलन्स दिली आहे. लोकांच्या सेवेसाठी लवकरच दुसरी अँब्युलन्स कार्यान्वित होणार आहे. कोरोना काळात अगदी अहोरात्र रूग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कोरोनामुळे विकासकामे थांबली तरी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहिलो असून या समस्या सोडवण्यात चांगले यश मिळाले आहे. असे सांगून आमदार पाटील यांनी राज्यातून कोटा येथे आय. आय. टी.,जेईई परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थी व बिकानेर (राजस्थान) येथे नवोदय विद्यालयात अडकलेले विद्यार्थी व पालक यांना तातडीने प्रयत्न करुन त्यांच्या गावी आणण्यासाठी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्याकडे फोन व मेलव्दारे पाठपुरावा केला व त्यांना गावी परत आणले. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली आहे. त्यांना प्रत्येकी एक लाख रूपये मदत द्यावी यासाठी विधीमंडळ अधिवेशनात आग्रही मागणी केली होती.याची दखल घेत राज्य शासनाने अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

मतदार संघातील नवीन विकास कामाबाबत बोलताना आमदार पाटील यांनी कोरोना नियंत्रणासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी दिल्याने सर्वच विकासकामांच्या निधीला मर्यादा आल्या आहेत. तरीही मतदारसंघातील विविध विकासकामासाठी चाळीस कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.या विकास कामांचा शुभारंभ दिपावलीनंतर केला जाणार आहे.आगामी काळात कोरोनाचे संकट बाजूला करत आपण पुन्हा विकासाचा नवा सुर्योदय करून करवीरच्या विकासाला गती देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पा बाबत बोलताना आमदार पाटील यांनी दिर्घकाळ रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या कंत्राटदाराच्या देण्याचा तिढा सोडवून या प्रकल्पाच्या पुर्ततेतील अडथळा दूर केला आहे.त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असा विश्वास पी एन पाटील यांनी व्यक्त केला आहे .

करवीर विधानसभा मतदार संघातील जनतेने एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणूकीत मोठ्या विश्वासाने मला चांगल्या मताधिक्याने विजयी केले . त्या विश्वासाला न्याय देण्याचे काम मी विकास कामातून करेन अशी ग्वाही देऊन मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी सदैव कार्यरत राहतानाच प्रशासकीय पातळीवर देखील मतदारसंघातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. असे सांगून आपल्या सर्वांचे आशीर्वाद व पाठबळ सदैव मिळावे अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली आहे.

Related Stories

मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून फीवसुली करू नका

Archana Banage

आशा गटप्रवर्तकांनी संघटीत होऊन लढा द्यावा

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी वापरलेले साहित्य रस्त्यावर, हातकणंगलेजवळील प्रकाराने संताप

Archana Banage

विद्यापीठातील विविध पदांसाठी १४ नोव्हेंबरला निवडणूक

Archana Banage

Kolhapur; अतिवृष्टी बाधित रस्त्यांसाठी पावणे दोनशे कोटी निधी द्या; आ. सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची मागणी

Abhijeet Khandekar

संभाजीनगरातील जुगार अड्ड्यावर छापा; दहा जणांवर कारवाई

Archana Banage