Tarun Bharat

कराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

लष्कर आणि पाकची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ला मिळणारे स्रोत बळकावण्यासाठी कराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा इम्रान खान सरकारचा डाव आहे, असा आरोप मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसैन यांनी केला आहे. 

कराची शहर पावसामुळे खराब झाले असून, स्वच्छता करण्याची गरज आहे. त्यासाठी लष्कराला सूचना केल्याचे  इम्रान यांनी म्हटले होते. त्यानंतर हुसैन यांनी हे वक्तव्य केले आहे. शहराच्या स्वच्छतेच्या नावाखाली कराचीला लष्कराच्या ताब्यात दिले जात आहे. कराची शहराला स्वायत्तता, अधिकार आणि सत्ता प्रदान करण्याऐवजी इम्रान खान सरकार कराची शहराचा ताबा केंद्रीय सरकारच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनच्या मदतीने कराचीला फेडरल टेरिटरी घोषित करण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्यासाठीची योजना पाक लष्कर आणि ‘आयएसआय’ने पूर्ण केली आहे. ही बाब निषेधार्ह आहे, असे हुसैन यांनी म्हटले आहे.

Related Stories

चरस विक्रीसाठी आलेला रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Archana Banage

सोन्याची तस्करी करणाऱया तीन महिलांना मुंबई विमानतळावरून घेतले ताब्यात

Tousif Mujawar

कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींच्या प्रशासकीय व वित्तीय मान्यता- पालकमंत्री

Abhijeet Khandekar

बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

मध्यप्रदेशात आणखी एका काँग्रेस नेत्याला धमकीचे पत्र

datta jadhav

घुंगरेगावात शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!