Tarun Bharat

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची कारवाई

प्रतिनिधी/ कराड

मलकापूर ता. कराड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमिर फारूख शेख (वय 29) याला एक वर्षांसाठी सातारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी मंजूरी दिली आहे. शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी,सशस्त्र दहशत माजवण्यासह इतर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार

अमीर फारुख शेख याच्या विरुद्ध स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील यांनी सादर केलेला होता.  स्थानिक गुन्हे शाखेने पडताळणी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधिक्षक 

धीरज पाटील  यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे  जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रस्तावाची पाहणी केली.  अमिर शेखकडून  खूनाचा प्रयत्न

करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत करणे व सार्वजनिक

शांततेस बाधा उत्पन्न होत असल्याची कृत्ये होत असल्याने त्यास 1

वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याच्या प्रस्तावाचे  आदेश काढले आहेत. त्याला 1 वर्षा

करीता सातारा जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,  पोलीस उपअधिक्षक  सुरज गुरव, अशोक थोरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील,विजय गोडसे, स हवालदार प्रविण शिंदे, विजय कांबळे, प्रमोद सावंत, नितीन येळवे, संजय जाधव, सचिन साळुखे, प्रफुल्ल गाडे, विनोद माने, मारुती लाटणे यांनी

कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

Related Stories

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

कोडोलीत मुंबईहून आलेल्या महिलेची माहिती घेण्यास गेलेल्या आशासेविकेस शिवीगाळ

Archana Banage

सोलापूर : जीवनावश्यक वस्तू, खाद्य तेल, इंधन दरवाढ व महागाई विरुद्ध माकप आक्रमक

Archana Banage

सातारा बोगदा परिसरात माथेफिरूची दहशत

Amit Kulkarni

वनराज कुमकर यांनी घरातून केले नवं उधोजकाना मार्गदर्शन

Archana Banage

शहरात इच्छूकांची नुसतीच घाई

Patil_p
error: Content is protected !!