Tarun Bharat

कराडचे गॅंगवॉर कायमचे संपवणार

प्रतिनिधी / कराड

सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. या जिह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस करत आहेत. कराडला गुन्हेगारी टोळय़ांच्या मुसक्या आवळण्यासाठी तडीपारीच्या कारवाया सुरू असून या टोळ्या कायमच्या संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. 

कराड शहर पोलीस ठाण्याला त्यांनी शनिवारी धावती भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. नूतन पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, किशोर धुमाळ यांची उपस्थिती होती. 

जिल्हा पोलीसप्रमुख बन्सल म्हणाले, सातारा जिल्हा पेन्शरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी संपवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. कराड शहर हे सुद्धा नेहमी चांगल्याच्या पाठिशी उभे राहणारे शहर आहे. या शहरासह तालुक्यातील टोळ्यांवर कारवाई झाली आहे. या टोळ्यांची कृत्ये कायमची संपवण्यासाठी आम्ही व्युहरचना आखत आहोत. शिवाय शस्त्र तस्करांवर कारवाई करताना त्यांच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शस्त्र तस्करीचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी कराड पोलिसांसह आम्ही सज्ज आहोत. 

सध्या कोरोना काळ सुरु असून कोरोना आटोक्यात ठेवण्याचे आमच्यासमोर आव्हान आहे. पोलीस दलातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना यापुढे कर्तव्यावर असताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी मी विशेष लक्ष देणार आहे. कोरोनाचा कोणत्याही पोलिसाला त्रास होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असेही अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.

Related Stories

सातारा आणि कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात पाच दिवस अतिमुसळधार पाऊस

Abhijeet Khandekar

महिला करणार गावातील पाण्याची तपासणी

datta jadhav

महिला ग्रामपंचायत सदस्याकडून आठ महिने वीज चोरी

datta jadhav

वाई तालुक्यात जांभळीकरांनी मोडले एकाच दिवसात रेकॉर्ड

Patil_p

सिटी पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान राबवा

Archana Banage

महाबळेश्वरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी

Archana Banage
error: Content is protected !!