Tarun Bharat

कराडमध्ये एकाच दिवसात 5 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

Advertisements

एकाच दिवसात कराडला पाच जण कोरोनाबाधित: कराडचा आकडा 16
जिल्ह्याचा आकडा 26
पाचही बाधित सापडले कराड उपजिल्हा रुग्णालयात

प्रतिनिधी / सातारा

कराडला शुक्रवारी एकही रुग्ण आढळला नाही म्हणून हुश्श होणार तोच शनिवारी एकाच दिवसांत 5 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एकाच दिवशी 5, हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वाधिक असून तो पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर एकट्या कराडमध्ये असल्याने धक्का कित्येक पटीने वाढलाच आहे.

कराड तालुक्यात 11 जणांना लागण झाली होतो. बाबरमाची येथील रुग्णासोबत नागपूर व्हाया पुणे असा कराड पर्यंतचा प्रवास केलेल्या रुग्णामुळे कराडचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रविवारी, कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या पैकी 5 जण पॉझिटीव्ह निघाले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान, सापडलेले रुग्ण हे नक्की कोणत्या रुग्णाच्या सहवासांत होते व कुठले राहणारे आहेत, हे अजून प्रशासनाने अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. त्यामुळे, अफवा पसरण्याची शक्यता असून कराड तालुका, सातारा जिल्ह्यातील नागरिक – ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाधितांचा आकडा वाढत आहे पण घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी “तरुण भारत” शी बोलताना केले आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 21. पण….

बाबरमाची + ……6
निझरे + …………6
कोरोनामुक्त……..3
बळी……………..2

यांचीच एकूण बेरीज 17, उर्वरित फक्त

महारुगडेवाडी……..1 ( दि. 15 एप्रिल )
डेरवण……………..1 ( दि. 15 एप्रिल )
ओगलेवाडी………..1 ( दि. 15 एप्रिल )
फलटण……………1 ( दि. 15एप्रिल )

Related Stories

एसटीच्या चाकांना सोमवारी ब्रेक

Patil_p

शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस राष्ट्रवादी भवनात उत्साहात साजरा

Patil_p

ढोकावळे, आंबेघर भूस्खलन क्षेत्राला विनय गौडा यांची भेट

datta jadhav

ड्रग्ज प्रकरणी टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबी केली अटक

Rohan_P

अमरावती शहरात संचारबंदी

datta jadhav

कोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!