Tarun Bharat

कराडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण; जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन वर

Advertisements

प्रतिनिधी / सातारा
कोरोना सावट देशभरात गंभीर होवू पहात असताना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्याच्या सधन गावातील मात्र नोकरीनिमित्त मुंबईमध्ये रहात असलेला 35 वर्षीय युवक कोरोना संसर्गित असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी कृष्णामध्ये दाखल करण्यात आले होते गुरुवारी त्याचा रिपोर्ट पोझेटिव्ह असल्याचे एन. आय. व्ही.ने कळवले. यामुळे कराडसह तालुका व जिल्ह्यात पुन्हा घबराहट निर्माण झाली असून लोकांनी घाबरून जाण्यापेक्षा “लॉक डाऊन”चे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
दरम्यान, निजामुद्दीनच्या मरकजला जाऊन आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात कालपर्यंत दाखल झालेल्यांपैकी 31 अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे. तर गुरुवारी दिवसभरात जिल्हय़ातील 18 अनुमानित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून यापैकी सातारच्या जिल्हा रुग्णालयात 3 तर कराड तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
एकूणच जिल्ह्यात आजवर 104 जणांना दाखल करण्यात आले असून 97 जण निगेटिव्ह, 3 जण पोझेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार, दि. 1 एप्रिल रोजी विलगीकरणात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 23 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे एन. आय. व्ही. पुणे यांनी कळविले आहे. बुधवार, दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा सातारा जिह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 9 नागरिक व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 9 नागरिक अशा एकूण 18 अनुमानित रुग्णांना अनुमानीत करण्यात आले. यात साताऱ्यात 3 तर कराडच्या कृष्णामध्ये येथे 15 दाखल केले असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या 18 जणांपैकी 9 नागरिक हे परदेश प्रवास करुन आलेले असुन त्यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील 5 पुरुष व 4 महिला आहेत. तसेच 7 नागरिक हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असुन त्यामध्ये 20 ते 84 वयोगटातील 5 पुरुष व 2 महिला असून 1 वर्षाच्या मुलाचा व मुलीचा यात समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे काल रात्री उशिरा पाठविण्यात आले आहेत.
निजामुद्दीन तबलिगी केलेले सर्व जण निगेटिव्ह
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीनला तबलिगीसाठी साताऱ्यातुन 2 तर कराड येथील पाच बांधव गेले होते. महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांना तातडीने दोन्ही विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर यातील एकाच बुधवरीच रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अन्य चौघांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, या पाच व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या घरातील व परिवारातील सदस्यांची तपासणी सुरू असून, त्यांना होम कॉरनटाइन करण्यात आले आहे. मात्र, या वरून कराड शहरातील अथवा परिसरातील लोकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच थांबावे. बाहेर इतरांच्या संपर्कात येऊ नये, असेही डॉ. गडीकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात गुरुवारी 22 जण विविध ठिकाणी दाखल
गुरुवारी साताऱ्यात 3 तर कराड कृष्णाला 15 जण अनुमानीत म्हणून दाखल झाले आहेत. यांच्या स्त्रावाचे नमुने एनआयव्ही ला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा रुग्णालयात 3 जण श्वसनाचा त्रास होत असल्याने दाखल झाले आहेत तर एकजण सातारा हॉस्पिटलमध्ये श्वसनाला त्रास होत असल्याने ऍडमिट झाला आहे.
गुरुवार 2एप्रिल 2020 सायं- 5 वा.
सातारा जिल्हा अचूक आकडेवारी

 1. एकूण दाखल……104
 2. जिल्हा शासकीय रुग्णालय…..73
 3. कृष्णा हॉस्पीटल, कराड……3
 4. खाजगी हॉस्पिटल ……1
 5. कोरोना नमुने घेतलेले……104
 6. कोरोना बाधित अहवाल……3
 7. कोरोना अबाधित अहवाल…..97
 8. अहवाल प्रलंबित…….4
 9. डिस्चार्ज दिलेले……97
 10. सद्यस्थितीत दाखल…….7
 11. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 2.4.2020)……554
 12. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती..554
 13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती….401
 14. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पुर्ण न झालेल्या व्यक्ती…..153
  14.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले…..50
 15. यापैकी डिस्जार्ज केलेले…..15
 16. अद्याप दाखल……34

Related Stories

शहर पोलिसांकडून तडीपार गुंडास अटक

Patil_p

ठाकरे सरकारची जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

datta jadhav

सातारा : पंचायत राज सशक्तीकरण अभियानमध्ये सातारा जिल्ह्याचा दिल्ली दरबारी झेंडा

Abhijeet Shinde

पालिकेच्या तिजोरीत 30 लाखांचा महसूल

Patil_p

आरक्षण द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या

Patil_p

फलटणमध्ये आणखी दोन रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!