Tarun Bharat

कराडमध्ये डबल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई

वार्ताहर/ कराड

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वाहतुकीची नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार दुचाकीवरून एकटय़ानेच प्रवास करावयाचा असतानाही कराड शहरातून डबल सीट प्रवास करणाऱया दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोनपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱया चार चाकी व रिक्षांवरही कारवाई करण्यात येत आहे.

     कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स महत्वाचे असल्याने लॉकडाऊन शिथील करताना प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार दुचाकीवरून केवळ एकटय़ानेच प्रवास करता येणार आहे. तर रिक्षा व चारचाकी वाहनांत चालक व दोन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. असे असताना शहरात मात्र काही दुचाकीस्वार डबल व ट्रिपल सीट फिरताना दिसत आहेत. तर रिक्षा व चारचाकीतही दोनपेक्षा जास्त प्रवासी बसलेले दिसत आहेत.

    वाहतूक पोलिसांनी नियमांची पायमल्ली करणाऱया वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. डबल सीट प्रवास करणाऱया दुचाकी व दोन पेक्षा जास्त प्रवासी असणाऱया रिक्षा व चारचाकी वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभर पाऊस सुरू असतानाही भर पावसात पोलिसांची कारवाई सुरू होती.

Related Stories

फाशीचा वड स्मारकास विद्रोहींकडून अभिवादन

datta jadhav

पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, फडणवीस-दरेकर साथीला- नारायण राणे

Archana Banage

साताऱ्यात आज एकाच दिवशी 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण

Archana Banage

महाविकासआघाडी मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

पाटील भावकीतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार

Patil_p

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Archana Banage