Tarun Bharat

कराडमध्ये दीड लाखाचा गुटखा पोलिसांनी पकडला

पुसेसावळीच्या दोघांना अटक :  कार जप्त

प्रतिनिधी/ कराड

गुटख्यावर बंदी असतानाही छुप्या मार्गाने गुटख्याची तस्करी आणि विक्री होत आहे. शहर पोलिसांनी येथील पोपटभाई पेट्रोल पंप चौकात रात्री गस्त घालताना गुटख्याची तस्करी करणाऱया दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांचा गुटखा जप्त केला. प्रसाद अनिल देशमाने (वय 24, रा. सावळेश्वर मंदिराजवळ, पुसेसावळी) आणि आकाश दत्तप्रसाद बाचल (22, रा. गणपती मंदिराजवळ, पुसेसावळी) अशी संशयितांची नावे आहेत. कारवाईत दोन लाखांची कारही जप्त आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गुन्हे शाखेचे पोलीस रात्रगस्त घालत होते. यावेळी शहरात नाकाबंदी होती. त्यावेळी येथील पोपटभाई पेट्रोलपंपाजवळ वाहतूक नियंत्रण शाखेचे साहायक फौजदार राजू पाटील, हवालदार पूजा पाटील, बीट मार्शलचे संग्राम पाटील व दीपक पाडळकर बंदोबस्त करत होते. त्यावेळी त्यांनी सिल्वर रंगाची इस्टीम कार (एमएच 14 एएम 9092) तेथे अडवली. हवालदार पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना संशय आल्याने कार तपासली. त्यात गुटखा भरलेली पोती सापडली. कारमधील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हे शाखेचे साहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी तो गुटखा कर्नाटकातून आणल्याचे सप्पष्ट जाले. कारवाईत एक लाख 59 हजारांचा पानमसाला गुटखा आणि दोन लाखांची कार जप्त केली आहे. कारवाई दरम्यान दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर करत आहेत. गाडीसह पुढील कारवाईसाठी मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शाह यांना कळवण्यात आले आहे.

Related Stories

मुंबई कस्टमची मोठी कारवाई, २७ किलो ड्रग्स जप्त

Archana Banage

लसीकरण वाढीसाठी कृतीयुक्त आराखडा तयार

Amit Kulkarni

रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

datta jadhav

स्थलांतर थांबवायचे असेल तर बोंडारवाडी धरण झालेचं पाहीजे

Patil_p

गांधीनगरात 10 मे पर्यंत दुकाने बंदच राहणार

Archana Banage

वाढीचा आलेख सातव्या दिवशीही 100 च्या खाली

Patil_p