Tarun Bharat

कराडला बेड वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

जिल्हाधिकाऱयांची कृष्णा रूग्णालयास भेट, बहुउद्देशीय हॉलही लवकरच सुरू करणार

वार्ताहर / कराड

कराड तालुक्यात कोरोना रूग्णांची झपाटय़ाने वाढ होत असल्याने  प्रशासनाने आता बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी कृष्णा रूग्णालयासह अन्य रूग्णालयात बेडची संख्या वाढवण्याबरोबरच शहरातील बंद केलेली आयसीयू कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी कृष्णा रूग्णालय येथे भेट देऊन आढावा घेतला.

कराडला उपचाराची चांगली सोय असल्याने कराड तालुक्यासह जिल्हय़ातून व सांगली जिल्हय़ातील अनेक कोरोना बाधित कराडला येत आहेत. कराडला कृष्णा रूग्णालय, सहय़ाद्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, एरम हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कोयना हॉस्पिटल, क्रांती हॉस्पिटल, उपजिल्हा रूग्णालय आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. यातील सर्वाधिक कृष्णा रूग्णालयात सध्या 480 बेडची व्यवस्था आहे. पहिल्या लाटेत कृष्णा रूग्णालयात 600 बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने बेडही कमी करण्यात आले होते.

मात्र पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढु लागल्याने तालुक्यासह जिल्हय़ात व्हेंटीलेटर व आयसीयू बेडची संख्या कमी पडू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृष्णा रूग्णालय येथे भेट देऊन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच बेडची संख्या वाढवण्याबाबत चर्चाही केली. यावेळी प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. अशोक क्षीरसागर व अधिकारी उपस्थित होते.

 कराड हॉस्पिटलमध्ये 45 बेड असून सध्या 37 रूग्ण दाखल आहेत. एरम हॉस्पिटलमध्ये 43 बेड असून 35 रूग्ण दाखल आहेत. श्री हॉस्पिटलमध्ये 29 बेड असून 17 रूग्ण दाखल आहेत. सहय़ाद्री हॉस्पिटलमध्ये 100 बेडची सोय असून 128 रूग्ण दाखल आहेत. तर क्रांती हॉस्पिटलमध्ये 19 बेडची सोय असून 12 रूग्ण दाखल आहेत. यशवंतनगर येथे सहय़ाद्री सेंटरमध्ये 200 बेडची सोय असून या ठिकाणी सध्या 82 रूग्ण दाखल आहेत. तर गरजेनुसार पार्लेचे सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

  रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहेत. मात्र होम आयसोलशनची सोय असल्याने लक्षणे नसलेल्या व सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने प्रशासनाने ऑक्सिजनयुक्त आयसीयू बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 50 बेडची क्षमता असलेले स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होत आहेत. तर बालाजी व कोयना सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रांतअधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.

Related Stories

शिरवळ क्रीडा संकुलासाठी 1.20 कोटींचा निधी

datta jadhav

अनावळेवाडी शाळेतील साहित्य चोरीला

datta jadhav

नाक्यावर भटक्या प्राण्यांची दादागिरी

Patil_p

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी ठिय्या

Patil_p

चला सातारा शहर बनवूया ‘कलरफुल’

Archana Banage

सातारा : कण्हेर योजनेचे पाणी लवकरच शाहुपुरीकरांच्या घरात

datta jadhav