Tarun Bharat

कराडला विनाकार फिरणारांची तपासणी

Advertisements

एक महिला बाधित, नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राचा उपक्रम

वार्ताहर / कराड

  कडक लॉकडाऊन सुरू असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया तसेच रूग्णालयात ये जा करणाऱया रूग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्याची मोहिम नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन राबवण्यात येत आहे. यासाठी कोल्हापुर नाका येथील चेकपोस्टमध्ये एक पथक तैनात करण्यात आले असुन गुरूवारी दुपारपर्यंत या ठिकाणी 40 जणांची तपासणी करण्यात आली. यात एक महिला बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

   सुरवातीपासुनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात 20 हजारहुन अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत होरपळुन निघालेल्या कराड तालुक्यात दुसऱया लाटेनेही हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. जिल्हाअधिकाऱयांच्या आदेशानुसार मंगळवार पासुन कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरीही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना आडळत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन कोल्हापुरनाका येथे तपासणी पथक तैनात करण्यात आले आहे. शहरात येणाऱया प्रत्येकाची पोलिस कसुन चौकशी करीत आहेत. जर त्या व्यक्तीला रस्त्यावर येण्याचे सबळ कारण देता आले नाही तर त्याची कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. गुरूवारी दुपारपर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली. यात एक महिला बाधित असल्याचे समोर आले आहे.

    यावेळी, मुख्याधिकारी रमाकांत डाके म्ह्णाले की, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातुन कडक उपायोजना राबवण्यात येत आहेत. अशा वेळी विनाकारण फिरणे टाळणे गरजेचे आहे. तसेच रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना वारंवार रूग्णालय, लॅब व अन्य ठिकाणी फिरावे लागत आहे. अशा नातेवाईकांचीही वेळेत तपासणी झाल्यास कोरोनाचा प्रसार रोखता येणार आहे. त्यामुळे पालिकेना हा उपक्रम सुरू केला आहे.

 आरोग्य सभ्घपती विजय वाटेगावकर म्ह्णाले की, या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी एक बाधित सापडल्याने या माहिमेची गरज आणी महत्व स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही मोहिम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. घरीच थांबुन शासनाच्या सर्व निर्देशांचे पालक करण्याचे आवाहन विजय वाटेगावकर यांनी केले आहे.

Related Stories

साताऱयातील पाच रेशन दुकानांवर कारवाई

Patil_p

कॅनरा बँकेच्या एटीएममधून चोरटय़ांनी दीड लाख चोरले

Omkar B

रयत शिक्षण संस्था देशाचे भूषण

Patil_p

वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना निरोप

Patil_p

रयत कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध

Patil_p

जिह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ऍक्शन घ्या

Patil_p
error: Content is protected !!