Tarun Bharat

कराडला 32 एसटी कर्मचारी बडतर्फ

वार्ताहर/ कराड

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी जवळपास 77 दिवसांपासून संपात असलेल्या कर्मचाऱयांविरोधात एसटी प्रशासनाने आता कारवाईचा फास आवळला आहे. कराड आगारातील एकूण 32 कर्मचाऱयांना आतापर्यंत बडतर्फ करण्यात आले आहे. तर 19 कर्मचाऱयांना आरोप पत्राची नोटीस पाठवण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱयांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे आगारप्रमुख विजय मोरे यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱयांनी आंदोलन सुरू केल्यानंतर कराड आगारातील कर्मचाऱयांनीही सुमारे 77 दिवसांपासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कराड आगारातील एसटी सेवा ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या आवाहनानंतर काही चालक-वाहक कामावर हजर झाल्याने तुरळक प्रमाणात एसटी सेवा सुरू झाली आहे. एसटी प्रशासनाच्या वतीने कराड आगारातील रोजंदारीवर काम करणाऱया 18 कर्मचाऱयांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. तर 59 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबनाच्या कारवाईनंतर 9 कर्मचारी हजर झाले आहेत. निलंबन केलेल्या एकूण 32 कर्मचाऱयांना आतापर्यंत बडतर्फ केले आहे. तर 19 कर्मचाऱयांना आरोप पत्राची नोटीस बजावली आहे. उर्वरित कर्मचाऱयांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

कराड आगारात एकूण 11 चालक कामावर हजर झाले होते. यातील एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने दहा चालक व 29 वाहक सेवेवर हजर आहेत. तर अद्याप 244 चालक, वाहक कामावर हजर नसल्याचे सांगण्यात आले. 77 दिवसांनंतरही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे एसटी प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांचाही प्रचंड गैरसोय होत आहे. शासनाने सोमवारपासून पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातून येणाऱया विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Related Stories

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी डिस्चार्ज

Tousif Mujawar

सातारा : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला…

Archana Banage

अवकाळीचा सातारा जिल्ह्यात कहर; पसरणी, मांढरदेव घाटात दरडी कोसळल्या

Abhijeet Khandekar

भक्कम पगाराची नोकरी सोडली अन् समाजसेवेसाठी अधिकारी झालो!

Patil_p

जिल्हय़ातील 61 घरांची पडझड

Patil_p

जिह्यात व्यवहाराची चाके रुळावर

Patil_p
error: Content is protected !!