Tarun Bharat

कराडवाडी गावच्या हद्दीत आढळला अनोळखी स्त्रीचा मृतदेह

लोणंद प्रतिनिधी

कराडवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत 40 ते 45 वयोगटातील अनोळखी स्त्रीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आले आहे.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशन मिळालेली अधिक माहिती अशी की कराड वाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास वनविभाग हद्दीत अंदाजे 40 ते 45 वयोगटातील स्त्रीचा अनोळखी मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या अंगावर तांबड्या रंगाची साडी आहे. ही घटना अंदाजे आठ दिवसापूर्वी घडल्याची शक्यता आहे. घटनास्थळी लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी पोलीस कर्मचारी महेश सपकाळ विठ्ठल काळे, विष्णू धुमाळ, अमोल पवार, फैयाज शेख, शिवशंकर तोटेवाड, बी.डी.प्रिया नरोटे, मेघा ननावरे यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. या मृतदेहबाबत कोणास काही माहीत असल्यास लोणंद पोलीस स्टेशनची संपर्क साधावा

Related Stories

सातारा जिल्ह्यातील 394 जणांना डिस्चार्ज तर 728 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

datta jadhav

लातूरच्या ॲडिशनल सीईओंच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

कर्नाटकात ऑनलाईन बेटिंग आणि जुगारावर बंदी; विधानसभेत विधेयक मंजूर

Archana Banage

तळाशील कवडा रॉकजवळ पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ

Anuja Kudatarkar