Tarun Bharat

कराडात अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून; तीन हल्लेखोरांचे भरदिवसा कृत्य

Advertisements

प्रतिनिधी / कराड

अवघ्या सतरा वर्षांच्या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडली. बारा डबरी परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.आदित्य गौतम बनसोडे (वय 17, रा. बाराडबरी परिसर, कराड) असे धारदार शस्त्राने खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट असून रात्री साडेआठ वाजता जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळास भेट दिली.
आदित्य बनसोडे दुपारी बाराडबरी परिसरात उभा होता. अचानक पावणे चार वाजण्याच्या सुमारास संशयित तेथे आले. त्यांनी आदित्य बनसोडे याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला वार केल्यानंतर संशयितांनी तेथून पलायन केले. घटनेनंतर परिसरातील लोकांनी नातेवाईकांच्या मदतीने जखमी आदित्यला उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून आदित्यला कृष्णा रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू असताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बारा डबरी परिसरात युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे शहर पोलिसांना कळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरूनच त्यांनी संशयितांच्या तपासाच्या अनुषंगाने पथके रवाना केली. तिघे संशयित असल्याचे प्रथम दर्शनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची नावे निष्पन्न करण्यास सुरुवात केली. दरम्यान अदित्यचा खून कोणत्या कारणाने झाला आहे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.

Related Stories

फॅमिली प्लॅनिंग असते तर लस कमी पडली नसती : खासदार उदयनराजे

Amit Kulkarni

ट्रान्सफॉर्मर फोडून 80 हजारांची चोरी

Amit Kulkarni

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage

सातारा शहरात खरेदीसाठी तुडूंब गर्दी

Patil_p

यंदाही झिम्मा फुगडीचा खेळ रंगला नाही

Patil_p

विजेच्या धक्क्याने उंबर्डेत म्हैस ठार

datta jadhav
error: Content is protected !!