Tarun Bharat

कराड येथे आरोग्यमंत्री टोपे यांची आढावा बैठक सुरु

प्रतिनिधी/सातारा

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजना बाबत आढावा बैठक सुरु झाली आहे.

या बैठकीला खा. शरद पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील, खा.श्रीनिवास पाटील , राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधानसचिव हे उपस्थित आहेत.

अपडेट

उदयनराजे, पृथ्वीराज चव्हाण यांची पाठ; श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना उपाय योजनांची आढावा बैठक कराडला होत असताना राष्ट्रवादीची जिल्ह्यातील नेते मंडळी या बैठकीस उपस्थित होती. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित उपस्थित राहिले. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे ही उपस्थित होते. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचीही अनुपस्थिती बैठकीत होती. तर कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत असल्यामुळे या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. खासदार श्रीनिवास पाटील यांनी विश्रामगृहावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जिल्ह्यातील उपाययोजनांबाबत काही मागण्या केल्या.

शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडला सिव्हीलचा मुद्दा

आढावा बैठकीत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेची विश्वासार्हता जनमानसात संपली आहे, याकडे तातडीने लक्ष घातले पाहिजे, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. त्यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, विश्वासार्हता संपुष्टात येणार नाही. आमची येथे येण्यापूर्वी चर्चा झाली आहे. याबाबतचे निर्णय बैठकीनंतर जाहीर करण्यात येतील, असे सांगितले.

साताऱ्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली.
रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ चव्हाण साताऱ्याला येण्याची शक्यता.भाजपा आमदार शिवेन्द्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीशी जवळीक कायम.
आमदार शिवेन्द्रराजे हे जरी भाजपा असले तरी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे यांच्या सह राष्ट्रवादीशी त्यांची जवळीक कायम आहे.
खा. पवार कराड मध्ये दाखल होण्या आधी सभापती रामराजे यांच्या गाडीतून शिवेन्द्रराजेंनी सातारा ते कराड असा प्रवास पूर्ण केला होता.
खा. पवार यांच्याशी त्यांनी स्वतंत्र बैठकीही केली.

Related Stories

भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले, दोघेजण जागीच ठार

Abhijeet Khandekar

मनपा कर्मचारी संपाच्या पवित्र्यात

Archana Banage

ऐन 31 डिसेंबरला कांदा महागला

Patil_p

सांगली : तुजारपुरात पत्नीसह शेजाऱ्यावर तलवारीने खुनी हल्ला,पतीची आत्महत्या

Archana Banage

जिल्हाधिकाऱयांकडून चेकपोस्टची पाहणी

Patil_p

साताऱयात बंदला संमिश्र प्रतिसाद

Patil_p