Tarun Bharat

कराड येथे घरफोडी करणारा गजाआड,तीन तोळे दागिने हस्तगत

प्रतिनिधी / कराड

कराड शहर व परिसरात चोरी करणार्‍यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ओगलेवाडी येथे करण्यात आली. शितल गोरख काळे (रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील एका घरात मागील चार दिवसांपूर्वी शितल काळेने 70 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व गंठण चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस करत होते. शितल काळे हा ओगलेवाडी येथे एका दुकानात सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ओगलेवाडी येथे सापळा रचून शितल काळे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र व गंठण मिळून आले.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस नाईक संजय जाधव, विनोद माने, तानाजी शिंदे, मारूती लाटणे यांनी केली.

Related Stories

साताऱ्यात दूध तापले

Archana Banage

बापट साहेब, ’तुम्हीच नारळ फोडा’

Patil_p

घंटागाड्या नियंत्रणाबाहेर; शहरात साठला कचरा

Patil_p

पंचनाम्यापासून एकही बाधित कुटूंब वंचित राहू नये

Patil_p

कुख्यात कल्याणी देशपांडेला 7 वर्ष सक्तमजुरी, 10 लाखांचा दंड

datta jadhav

इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्यामागचे गौडबंगाल काय?

Patil_p