Tarun Bharat

कराड शहरातील सात जिम सील

Advertisements

मलकापुरात एक जिम सुरू सापडल्याने पालिका व पोलिसांची कारवाई

वार्ताहर/ कराड

लॉकडाऊन अंतर्गत सर्व जिम बंद ठेवण्याचे आदेश असतानाही मलकापूर हद्दीत एक जिम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ती जिम सील केली. मात्र त्याचबरोबर पालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कराड शहरातील बंद असलेल्या सात जिमही सील केल्या.

    कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभर लॉकडाऊन सुरू आहे. सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने अधिक कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना मलकापूर हद्दीतील एक नामांकित जिम सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांना जिममध्ये व्यायाम करणारे लोक आढळून आल्याने पोलिसांनी त्या जिमवर कारवाई करत जिम सिल केली.

 त्यानंतर कराड नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत कराड शहरातील सात जिमही सील केल्या. याबाबत काही जिम संचालकांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानंतर शहरातील सर्व जिम बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शासनाचा आदेश डावलून सुरू असलेल्या जिमवर कारवाई करावी. मात्र सरसकट जिम सील करणे योग्य नाही. जिममध्ये लाखो रूपयांचे व्यायामाचे साहित्य असते. किमान आठवडय़ातून एकदा तरी सर्व साहित्याची साफसफाई करून ऑईल करणे गरजेचे आहे. अन्यथा लाखो रूपये किमतीचे व्यायामाचे साहित्य खराब होऊ शकते. त्यामुळे सरसकट जिम सील करू नयेत.

Related Stories

‘लस आपल्या दारी’ उपक्रम फलदायी

datta jadhav

मंत्रीमंडळ विस्तार…आषाढीनंतर

Abhijeet Khandekar

उञे गावचे वीज खांब पाण्याखाली ; नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सांगरुळतील ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात बंधने शिथिल

datta jadhav

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!