Tarun Bharat

करासवाडा येथे वीज सबस्टेशनचे उद्घाटन

आता म्हापसा आसपास परिसरात 24 वीजपुरवठा, 10 हजार निवासी घरे, व्यावसयिक आस्थापनांना लाभ : मंत्री नीलेश काब्राल

प्रतिनिधी / म्हापसा

करासवाडा म्हापसा येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही नवीन वीज सबस्टेशनचे रितसर उद्घाटन राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते ऑनलाईन  उद्घाटन करण्यात आले. राज्यात प्रथमच अशाप्रकारे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

गोवा राज्यदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री नीलेश काब्राल, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, थिवी आमदार नीलकंठ हळर्णकर, कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर, सहाय्यक अभियंता नॉर्मन आथायद, कनिष्ठ अभियंता रेषा पेडणेकर, कंत्राटदार शशांक शर्मा, राजेश तुषार आदी उपस्थित होते.

म्हापसा सब स्टेशनवर म्हापसा मतदारसंघाचा सुमारे 90 टक्के भार झाला होता. त्यामुळे आसपास परिसरात विजेचा दाब कमी होऊन अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. करासवाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनमध्ये दहा एमएचे दोन पॉवर स्टेशन बसविण्यात आले आहेत. या वीज स्टेशनचा लाभ 10 हजार घरांना तसेच 10 हजार व्यावसायिक अस्थापनांना होणार आहे. मुख्य स्टेशनमधून 12 एमए लोड करासवाडा सबस्टेशनमध्ये वळविण्यात येणार आहे. त्यामुळे आता म्हापसा व आसपासपरिसरात 24 तास वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी यावेळी दिली.

भूमिगत वीजवाहिन्या घालण्यावर देणार भर

म्हापशाच्sश आमदार जोशुआ डिसोझा यांनी चक्रीवादळाच्यावेळी दिवसरात्र सेवा देणाऱया अभियंता व वीज कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. म्हापशान 1 कोटी 31 लाख रु. खर्चून भूमिगत वीजवाहिनी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून तो मान्य झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो सौझा यांनी नवीन वीज स्टेशनमुळे आता म्हापशला नव्याने झळाळी येणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री व वीजमत्र्यांचे अभिंदन केले. सरकारने म्हापसा व हळदोण मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने नवीन पाऊल टाकल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 पत्रकारांशी बोलताना कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर म्हणाले, हे सब स्टेशन दोन एमए पॉवर स्टेशन करण्यात आले आहे. येथून आठ अकरा केव्ही फिडर बाहेर जातात. त्यात धुळेर, आकय, हणजुणे गिरी पर्रा, आसगाव, कुचेली व दोक औद्योगिक वसाहतीमध्ये फिडर असणार आहेत. 

म्हापसा सबस्टेशनवर यापूर्वीच 90 टक्के भार झाला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार वीज खंडित होत होती. नवीन सब स्टेशनसाठी 2018 साली आयडीसी ऑफ करासवाडा यांना 1500 चौ. मी. जागा देण्यात आली. या जागेत हे सबस्टेशन उभारण्यात आले आहे, अशी माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.

दहा हजार व्यावसायिक अस्थापनांना लाभ

करासवाडा औद्योगिक वसाहतीत येथे 10 हजार व्यावसायिक अस्थापनांना तसेच 10 हजार घरांना या वीज केंद्राचा उपयोग होणार आहे. याचा म्हापसा सबस्टेशनवर भार होता. त्यापैनी 12 एमए भार येथे वळविण्यात येईल. जेणे करून आता म्हापशात 24 तास वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर यांनी दिली.

 या सबस्टेशनमध्ये सर्व मशिनरी उभारण्यात आली आहे. अद्याप काही काम बाकी आहे. येत्या दोन महिन्यात हे सबस्टेशन सुरू करण्यात येईल,असे सहाय्यक अभियंता नॉर्मन आथायद यांनी सांगितले.

Related Stories

जि.पं. निवडणूक 12 रोजी घेण्यावर एक‘मत’

Patil_p

खोतीगावच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू, नागरिकांत समाधान

Amit Kulkarni

काणक्यातील तिघेही ‘निगेटिव्ह’

Omkar B

सीमेवर कोविड नेगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती कराच

Patil_p

कुर्टीतून संजना नाईक यांचा विजय निश्चित

Patil_p

गोव्यासह अनेक राज्यांत सीबीआयचे छापे

Patil_p