Tarun Bharat

‘करुणा आणि धनंजय मुंडे यांची प्रेम कहानी मराठीत येणार’

Advertisements

‘करुणा मुंडे यांनी दिली माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी

करुणा मुंढे आज कोलापुरात असून त्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई चे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी यावेळी आपल्या आणि धनंजय मुंडेंच्या प्रेमाविषयीही भाष्य केले.
बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी मोठी घोषणा केली होती. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं होतं. दरम्यान, आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा धनंजय मुंडे आणि आपली प्रेमकथा पुस्तक रुपात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

करुणा यावेळी म्हणाल्या, धनंजय आणि माझी प्रेम कहानी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे. तसेच माझ्या जीवनावर आधारित असणारी सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली असून अनेक बायका त्यांनी लपवल्या आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत धनंजय मुंडे यांना उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे यासंबंधी कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे.

Related Stories

देशातील पहिली अखंड शिवज्योत प्रज्वलित..!

Nilkanth Sonar

धोका वाढला : महाराष्ट्रात 15,817 नवीन कोरोनाबाधित

Tousif Mujawar

सत्तर गावातील शेतकऱ्यांची गैरसोय तरी कळे कृषी मंडळ कार्यालय बंदच

Archana Banage

Kolhapur : महापालिकेला 3 कोटींचा भुर्दंड

Abhijeet Khandekar

देशात नव्या रुग्णांमधील घट कायम

Patil_p

कोल्हापुरातील खासदारांच्या बंडाने नवी समीकरणे जुळणार, मोर्चेबांधणीला सुरवात

Kalyani Amanagi
error: Content is protected !!