Tarun Bharat

करुण नायर विवाहबद्ध

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय क्रिकेटपटू करुण नायर प्रियसी शनाया टंकरीवाला सोबत विवाहबद्ध झाला. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या विवाह सोहळय़ात दोघांनी सात फेरे घेतले. करुणनने सोशल मीडियावर आपल्या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत. गतवषी जुनमध्ये करुण व शनाया यांचा वाड:निश्चय झाला होता. यानंतर, शुक्रवारी उदयपूर येथे करुण आणि शनाया हे काही जवळच्या नातेवाईकांसह विवाहबंधनात अडकले. करुण सध्या कर्नाटककडून प्रथम श्रेणी सामने खेळत आहे. करुणने भारतीय संघाकडून 6 कसोटी सामने खेळले आहेत. शनाया नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमात काम करते. या सोहळय़ाला अजिंक्य रहाणे, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर व शार्दुल ठाकुर हे भारतीय संघातील सहकारी उपस्थित होते. 

Related Stories

जोकोविच, जेबॉर, सिनेर, गॉफिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

रोहितचे विदेशात पहिलेच कसोटी शतक

Patil_p

विंडीज संघाचा हॉलंड दौरा मे महिन्यात

Patil_p

जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सेनादलाकडून महाराष्ट्र पराभूत

Patil_p

बेशिस्त वर्तनाबद्दल मुश्फिकूर रहीमला दंड

Omkar B