Tarun Bharat

कर्करोगाचे वेळीच निदान होणे गरजेचे

आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार करुन तो बरा होतो. शिवाय नियंत्रणातही आणणे शक्मय होते. यासाठी आरोग्य कर्मचाऱयांनी घरोघरी जाऊन पालक आणि मुलांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा केएलई हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त हॉस्पिटलमधील बाल कर्करोग विभाग आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरवषी सुमारे 3 लाख मुलांना कर्करोगाचे निदान होते. यापैकी भारतात 85 हजार मुले कर्करोगग्रस्त आहेत. गेल्या दहा वर्षांत ही वाढ दुप्पटीने झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी यांनी हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱया कर्करुग्णांवरील उपचार पद्धतीबद्दल माहिती दिली. खर्च उचलण्यासाठी अनेक संस्थांचे सहकार्य मिळते. त्याचा उपयोग करुन बाल कर्करुग्णांना दिलासा दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी ज्येष्ट बालरोगतज्ञ डॉ. व्ही. डी. पाटील, बाल कर्करोग विभाग प्रमुख डॉ. अभिलाषा संपगार, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. आरीफ मालदार, डॉ. सुजाता जाली, डॉ. मनीषा भांडणकर, डॉ. तन्मया मेटगुड, डॉ. रोहन भिसे, डॉ. भावना कोप्पद उपस्थित होते. डॉ. गोपिका यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

मंडोळी हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni

‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रम उद्या

Amit Kulkarni

निवडणूक पार्श्वभूमीवर बाळेकुंद्रीत पथसंचलन

Patil_p

पाटील गल्ली येथील रस्त्याचे भाग्य उजळले

Amit Kulkarni

वादळी वाऱयाने नंदगाव शाळेचे उडाले पत्रे

Patil_p

बांदोडा येथे काजूच्या बागायतीला आग 2 लाखाची हानी

Patil_p
error: Content is protected !!