Tarun Bharat

कर्करोग झालेल्या बालिकेच्या मदतीसाठी साऊदीच्या जर्सीचा लिलाव

Advertisements

वृत्तसंस्था/ ऑकलंड

न्यूझीलंडमधील आठ वर्षांची बालिका होली बेटीला कर्करोगाची बाधा झाली असून तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून होली कर्क रोगाशी कडवी लढत देत आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यात वापरलेल्या जर्सीचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम होलीला मदतनिधी म्हणून दिली जाणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ही अंतिम लढत झाली होती आणि न्यूझीलंडने भारताचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज टीम साऊदीने वापरलेल्या जर्सीचा लिलाव केला जाणार आहे. या जर्सीवर न्यूझीलंड संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱया आहेत.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेचा लंका दौरा सप्टेंबरात

Patil_p

चेन्नईविरुद्ध दिल्ली ठरले ‘सुपरकिंग्स’!

Patil_p

अँडी मरेचे विजयी पुनरागमन

Patil_p

इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅन्सेनचे पाच बळी

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी

Patil_p
error: Content is protected !!