Tarun Bharat

कर्जाच्या आमिषाने उद्योजकाला लाखोंचा गंडा

प्रतिनिधी / कोल्हापूर

 तुम्हाला फायनान्सचे कर्ज मंजुर झाले आहे. त्याचे पैसे देतो असे भासवून गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील एका उद्योजकाला भामटय़ांच्या टोळीने 7 लाख 61 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. रामदास पांडुरंग सुरवसे (वय 35, रा. महा ई सेवा केंदाजवळ, गोकूळ शिरगाव, ता. करवीर) असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळीमध्ये तीन महिलासह दोन तरुणांचा समावेश आहे.

प्रिया शर्मा, काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या संशयित आरोपींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रामदास सुरवसे यांचा गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्लेटींगचा उद्योग आहे. प्रिया शर्मा या महिलेने फोन केला. फायनान्स कंपनीचे कर्ज मंजूर झाल्याचश सांगितले. काव्या कुलकर्णी नामक महिलेने कर्जासाठी लागणारी कागदपत्रे आपल्या व्हॉटसअपवरुन मागवून घेतली. यानंतर 7 लाख 61 हजारांचे लोन मंजुर झाल्याचे सांगितले.

नेहा सावंत व अमोल पवार या दोघांनी मंजुर लोनच्या वार्षिक हप्याची सर्व रक्कम भरा. त्याचबरोबर त्यांनी जीएसटी, तिकीट ऑफर 30 लाखापर्यत वाढविण्यात आल्याचे सांगितले. राजीव राणे या संशयित आरोपीने सुरवसे यांच्याशी पैसे भरण्यासाठी वारंवार मोबाईलवरुन संपर्क साधून त्यांच्याकडून त्याने वेगवेगळ्या कारणासाठी 7 लाख 61 हजार घेवून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. उद्योजक सुरवसे यांनी  ऍक्सीस बॅक, पंजाब नॅशनल बॅक, ओरीएंटल बॅक ऑफ कॉमर्स, पॅनरा बॅक या चार बँकेतील खात्यावरुन टोळीला पैसे दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

Related Stories

कब्जेदार नोंदीसाठी हलसवडे ग्रामस्थांचे धरणे

Archana Banage

कोल्हापुरात 50 वर्षांवरील सर्वांची वैद्यकीय तपासणी होणार

Archana Banage

अखेर 72 तासाने महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा सुरू

Archana Banage

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या

Archana Banage

साताऱ्यात कॉंग्रेसचे आंदोलन; महिला पदाधिकाऱ्यांनी थापल्या चुलवर भाकऱ्या

Abhijeet Khandekar

जिल्हा परिषदेकडून १२ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

Archana Banage