Tarun Bharat

कर्जाला कंटाळून व्यापार्‍याची आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

लऊळ ता.माढा येथील लाकडाचे व्यापारी चतुर्भुज सिताराम जानराव ( वय ५५ ) यांनी कर्जास कंटाळून शनिवारी दि.१८ रोजी पहाटे सहाच्या दरम्यान रेल्वे गेटजवळील चिंचेच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की चतुर्भुज जानराव हे लऊळ येथील लाकडाचे व्यापारी होते.त्यांच्याकडे काही लोकांचे कर्ज होते.त्याला कंटाळून त्यांनी शनिवारी पहाटे आत्महत्या केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली,एक अविवाहित मुलगा,असा परिवार आहे. त्यांच्यावर कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून लऊळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Related Stories

पंढरपुरात 21 आरोग्य कर्मचारी,17 कैद्यांना कोरोनाची बाधा

Sumit Tambekar

Solapur; रेल्वेने चौघांना चिरडले

Abhijeet Khandekar

खर्डीत चोरट्यांनी फोडली दुकाने

Abhijeet Shinde

६ हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह लिपिकास अटक

Abhijeet Shinde

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी केंद्रांवर रवाना

Abhijeet Shinde

भाजपकडून विधान परिषदेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उमेदवारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!