Tarun Bharat

कर्ज माफीसाठी आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरणाची विशेष मोहिम – जिल्हा उपनिबंधक

प्रतिनिधी / कोल्हापूर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरणाची विशेष मोहिम , राबवण्यात यावी असे आदेश सहकार आयुक्त यांनी सहकार विभागाला दिले आहेत अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेच्या अंमलबजावणी मधील अनेक खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असून अनेक तक्रारीचे निराकरण देखील बाकी आहे . या बाबी निकाली लावण्याच्या उद्देशाने १५ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात यावी. या योजने अंतर्गत आजपर्यंत कोल्हापूर जिल्हयातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांची आजअखेर एकुण ४८९१३ इतक्या शेतकन्यांची यादी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेली आहे.या प्राप्त झालेल्या यादीपेकी ४८१८९ इतक्या कर्जखात्यांची आधार प्रमाणिकरणाची प्रक्रीया पुर्ण झालेली असून यापैको ४७६६५ शेतकऱ्यांची रु .२८३.८६ कोटी इतकी कर्जमुक्तीची रक्कम संबंधीत शेतकन्यांच्या खात्यावर जमा करणेत आलेली आहे .

या योजनेच्या प्राप्त यादीनुसार अद्यापही पूर्वीच्या ५३० खात्यांचे व नविन प्राप्त यादीनुसार १९९ अशा एकुण ७२९ कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रीया अद्याप अपूर्ण आहे. योजना अंमलबजावणी अंतर्गत शासनामार्फत उर्वरीत पात्र कर्जखात्यांची यादी विशिष्ठ क्रमांकासह प्रसिध्दीसाठी दिनांक २३ ऑक्टोबर रोजी योजना पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यायादीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडील कर्जखाती व व्यापारी बँकाकडील कर्जखाती यांचा समावेश आहे.

याशेतकन्यांना आधार प्रमाणिकरण करुन घेण्यात यावी अस आदेशात म्हटले आहे. या योजने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्याठी ज्या शेतक -यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रीया अपूर्ण आहे. अशा शेतकन्यांनी यादीनुसार विशिष्ठ क्रमांक , आधार कार्ड व बचत खाते पासबुक घेऊन बँक शाखेमध्ये / जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तातडीने आधार प्रमाणीकरण करावे असे अवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

अखेर `या’ माणसांना मिळणार नवा चेहरा…

Archana Banage

सातवेत अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार

Archana Banage

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण शंभर टक्के भरले

Archana Banage

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडणारच

Archana Banage

पासार्डे येथील प्राथमिक शाळेची भिंत ढासळली

Archana Banage

वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप; तांत्रिक बिघाडामुळे होतोय विलंब

Archana Banage