Tarun Bharat

कर्णधार करुणारत्नेचे नाबाद शतक

पहिल्या दिवसअखेर लंका 3 बाद 267

वृत्तसंस्था/ गॅले

रविवारपासून येथे सुरू झालेल्या विंडीज विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत कर्णधार करुणारत्नेच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकेने पहिल्या डावात दिवसअखेर 88 षटकात 3 बाद 267 धावा जमविल्या. करुणारत्ने 132 धावांवर खेळत असून सलामीच्या निशांकाने अर्धशतक झळकविले. विंडीजतर्फे कसोटी पदार्पण करणारा जेरेमी सोलोझेनो क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या पहिल्या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि निशांका यांनी लंकेच्या डावाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 49.1 षटकात 139 धावांची शतकी भागीदारी केली. विंडीजच्या गोलंदाजीसमोर लंकेच्या या सलामीच्या जोडीने सावध फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. उपाहारापर्यंत लंकेने 27 षटकात बिनबाद 61 धावा जमवल्या होत्या.

खेळाच्या पहिल्या सत्रात लंकेच्या डावातील 24 वे षटक चालू असताना कर्णधार करुणारत्नेने पूलचा मारलेल्या फटक्यावर विंडीजचा सोलोझेनो जखमी झाला. हा वेगवान फटका सोलोझेनोच्या हेल्मेटवर आदळला. या घटनेनंतर सोलोझेनोला रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

उपाहारानंतर विंडीजच्या गॅब्रियलने निशांकाला कॉर्नवॉलकरवी झेलबाद केले. त्याने 140 चेंडूत 7 चौकारांसह 56 धावा जमविल्या. सलामीची जोडी फुटल्यानंतर लंकेने आणखी दोन फलंदाज लवकर गमविले. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला ओशादा फर्नांडो चेसच्या गोलंदाजीवर बॉनेरकरवी झेलबाद झाला. त्याने 3 धावा जमविल्या.

चेसने लंकेला आणखी एक धक्का देताना अनुभवी मॅथ्यूजला झेलबाद केले. त्याने 25 चेंडूत तीन धावा जमविल्या. करुणारत्नेने एका बाजूने संघाचा डाव सावरला. दिवसअखेर लंकेने तीन बाद 267 धावापर्यंत मजल मारली. कर्णधार करुणारत्ने 266 चेंडूत 13 चौकारांसह 132 तर धनंजय डिसिल्वा 77 चेंडूत 5 चौकारासह 56 धावात खेळत आहे. करुणारत्ने आणि डिसिल्वा यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 97 धावांची भागीदारी केली. विंडीजतर्फे चेसने 42 धावात 2 तर गॅब्रियलने 56 धावांत एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव 88 षटकात 3 बाद 267 (करुणारत्ने खेळत आहे 132, निशांका 56, धनंजय डिसिल्वा खेळत आहे 56, ओ. फर्नांडो 3, मॅथ्यूज 3, चेस 2-42, गॅब्रियल 1-56.

Related Stories

न्यूझीलंडचा सलामीवीर गुप्टीलला दुखापत

Patil_p

टोरँटो स्पर्धेतून जोकोविचची माघार

Patil_p

बांगलादेशचे लंकेला 258 धावांचे आव्हान

Patil_p

दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डीचे चॅम्पियन्स!

Patil_p

विजयी प्रारंभ करण्यास भारतीय महिला उत्सुक

Amit Kulkarni

इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये

Patil_p