Tarun Bharat

कर्णधार बाबर आझमचे नाबाद अर्धशतक

पाकिस्तानविरुद्ध दुसरी व शेवटची कसोटी – दिवसअखेर पाकिस्तान 2 बाद 161,

वृत्तसंस्था/ ढाका

यजमान बांगलादेशविरुद्ध शनिवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पाकने पहिल्या डावात 57 षटकात 2 बाद 161 धावा जमविल्या. बाबर आझम 99 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 60 तर अझहर अली 112 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावांवर खेळत आहे. अंधुक प्रकाशामुळे चहापानानंतरचा खेळ वाया गेला.

आयसीसी कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. या दुसऱया सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अबीद अली आणि अब्दुल शफीक यांनी संघाच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना 18.3 षटकात 59 धावांची भागीदारी केली.

बांगलादेशच्या तैजूल इस्लामने अब्दुल शफीकचा त्रिफळा उडविला. त्याने 50 चेंडूत 1 षटकार, 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. तैजूल इस्लामने पाकला आणखी एक धक्का देताना सलामीच्या अबिद अलीला त्रिफळाचीत केले. अबिदने 81 चेंडूत 6 चौकारांसह 39 धावा जमविल्या.

कर्णधार बाबर आझम आणि अझहर अली यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 91 धावांची भागीदारी केली. पाकने पहिल्या डावात 57 षटकांत 2 बाद 161 धावा पहिल्या दिवसाअखेर जमविल्या. खराब हवामान आणि अंधुक प्रकाशामुळे चहापानानंतरचा खेळ होऊ शकला नाही. बांगलादेशच्या तैजूल इस्लामने 49 धावांत 2 गडी बाद केले. पाकने उपाहारावेळी 31 षटकात 2 बाद 78 धावा जमविल्या होत्या. पाकचे शतक 36 षटकात नोंदविले गेले. 44 षटकात पाकने 2 बाद 123 धावा जमविल्या असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. दुसऱया सत्रात 26 षटकांचा खेळ झाला. चहापानावेळी पाकने 2 बाद 161 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

पाक प. डाव- 57 षटकात 2 बाद 161 (अबिद अली 39, अब्दुल शफीक 25, अझहर अली खेळत आहे 36, बाबर आझम खेळत आहे 60, तैजूल इस्लाम 2-49).

Related Stories

चाहत्यांशिवाय खेळण्यात नेहमीचा थरार नसेल

Patil_p

प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धा फेब्रुवारीत

Patil_p

जॉर्डन फुटबॉल संघाची भारतावर मात

Patil_p

अव्वल फुटबॉलपटू नेमारला कोरोना

Patil_p

अतुल बेदाडे यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

Patil_p

महिला आशिया चषक हॉकीसाठी सविताकडे नेतृत्व

Patil_p