Tarun Bharat

कर्णबधिरांच्या इंटरप्रेटरचा प्रश्न सुटेना

प्रज्ञा मणेरीकर/ पणजी

ंअंधत्व, अपंगत्व, तिरळेपणा हे शारीरिक व्यंग बघताक्षणी दिसून येतो. पण कर्णबधिरत्व हे न दिसणारे व्यंग. लवकर निदान झाले तर काही उपचारांमुळे ते दूर करता येऊ शकते. पण लक्षात यायला उशीर झाला तर त्यांच्या आयुष्यातील नाद हरवतो. समाजात वावरताना देहबोली स्पष्ट असल्याने अनेकदा गरज असूनही अशा व्यक्ती दुर्लक्षित राहतात. परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे लागलेला ऐकण्याच्या यंत्राचा शोध कर्णबधीर व्यक्तींसाठी वरदान ठरला आहे. आज 26 सप्टेंबर. दरवर्षी हा कर्णबधिरांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्णबधिरांना भेडसावणाऱया समस्या, त्यांची प्रगती याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

राज्यात सांकेतिक भाषा इंटरप्रेटरची कमतरता

 कर्णबधिरता, अपंगत्त्व हा नैसर्गिक किंवा अपघाताद्वारे निर्माण होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी यामागची कारणे वेगवेगळी असतात. कर्णबधिर लोकांच्या दैनंदिन जीवनात समस्यांविषयी सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. इतर गोष्टीने कर्णबधिरांच्या जीवनात प्रगती होत असली तरीही समाजात वावरण्याकरिता राज्यात अजूनही सांकेतिक भाषा शिकविणाऱया शिक्षकांची म्हणजे इंटरप्रेटरची कमतरता आहे.

 तंत्रज्ञानाच्या आधारे कर्णबधिरांना मिळाली अमूल्य मदत

भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचा भाग म्हणून सांकेतिक भाषेचे जतन करणे महत्त्वाचे आहे. कर्णबधिरांसाठी जसा भाषेचा विकास झाला तसेच त्यांना हाताळता येईल असे तंत्रज्ञानही मोठय़ा प्रमाणात विकसित झालेले आहे. संगणकापासून माहिती तंत्रज्ञानाची इतर सगळी साधने कर्णबधिर आणि मूकबधिरांसाठी उपलब्ध आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या आधारे कर्णबधिरांना अनेक प्रकारची मदत मिळाली आहे. कर्णबधिर समाजामध्ये काळानुसार थोडीफार जागरूकता निर्माण होत आहे. व्हिडिओ मोबाईल्स, व्हॉट्सऍप यामुळे कर्णबधिर एकमेकांशी जोडले जात आहेत. त्यांना या माध्यमांमुळे माहिती, ज्ञान मिळत आहे. कोठे काय चालले आहे, काय घडत आहे याची माहिती तसेच देश परदेशातील कर्णबधिरांच्या प्रगतीचा प्रवास त्यांच्यापर्यंत पोहचत आहे.

जगभरात 72 दशलक्ष कर्णबधिर

डब्ल्यूएफडीनुसार जगभरात अंदाजे 72 दशलक्ष कर्णबधिर आहेत. त्यापैकी विकसन देशांमध्ये 80टक्के पेक्षा जास्त कर्णबधिर लोक अस्तित्त्वात आहेत. तसेच यातील एकूण 300 पेक्षा जास्त भिन्न सांकेतिक भाषा वापरतात. राज्यात 3000 कर्णबधिर लोक आहेत. राज्यात 4 कर्णबधिरांसाठी शाळा व एक असोसिएशन कार्य करते. परंतु  सांकेतिक भाषा शिकविणाऱया शिक्षकांची अजूनही कमतरता आहे.

 सरकारी कार्यालयात इंटरप्रेटरची आवश्यकता : आवेलिनो डिसा

 गोव्यात पहिल्यांदाच यंदा मुख्यमंत्र्यांसाठी सांकेतिक भाषेतून बोलण्याकरिता इंटरप्रेटरची नियुक्ती करण्यात आली. राइट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलीटी काद्दा 2016नुसार सर्व सरकारी कार्यालयात, हॉस्पिटल आणि पोलिसस्थानकात सांकेतिक भाषा इंटरप्रेटर नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु एकही सरकारी कार्यालयात  सांकेतिक भाषा इंटरप्रेटरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आतापर्यंत डिसेबिलीटी राईट्स असोसिएशनतर्फे 25 जणांना सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आली असल्याची माहिती डिसेबिलीटी राईटस गोवाचे अध्यक्ष आवेलिनो डीसा यांनी सांगितले.

 सरकारी पातळीवर इंटरप्रेटरचे गांभीर्य ठेवणे गरजेचे : अनुप प्रियोळकर

लोकविश्वास प्रतिष्ठानपासूनच पहिल्यांदा सांकेतिक भाषा सुरू करण्यात आली. अजूनही या प्रतिष्ठानमध्ये येणारे शिक्षक सांकेतिक भाषा शिकण्याचे कोर्स करतात. परंतु सरकारी पातळीवर सांकेतिक भाषेचा इंटरप्रेटरबद्दल गांभीर्य घेण्यात आलेले नाही. सरकारी कार्यालयात एक किंवा दोन सांकेतिक भाषा इंटरप्रेटर असणे गरजेचे आहे. परंतु अजूनपर्यंत इंटरप्रेटरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलिस स्थानक, हॉस्पिटलमध्ये अजूनही दिव्यांगांना अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारी इंटरप्रेटर नसल्यामुळे अशा ठिकाणी दिव्यांग आपली व्यथा मांडू शकत नाहीत. लोकविश्वास प्रतिष्ठानमधून कुठल्याही कार्यक्रमांसाठी, स्पर्धांसाठी इंटरप्रेटरना उपलब्ध केले जाते अशी माहिती ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानचे ट्रस्टी अनुप प्रियोळकर यांनी दिली.

Related Stories

संजीवनी साखर कारखाना बंद पडू देणार नाही-

Patil_p

चोपडेतील खाजन पूर्ववत करा

Amit Kulkarni

साखळीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोलीभाषेचा मान राखला पाहिजे

Amit Kulkarni

खुनानंतर मयताचे कपडे काढल्याची आरोपीची कबुली

Amit Kulkarni

शिरोडय़ात 1.30 लाखांचा गांजा जप्त; संशयिताला अटक

Amit Kulkarni