Tarun Bharat

कर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे ३० जानेवारीला आयोजन

अध्यक्ष रविराज ताटे यांची माहिती : मंत्री जयंत पाटील व प्रतिक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : यावर्षी महिलांचाही समावेश : दि.१० डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी

प्रतिनिधी /इस्लामपूर

येथील कर्ण प्रतिष्ठाणच्यावतीने कर्ण मॅरेथॉन २०२२ इस्लामपूर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा दि.३० जानेवारी रोजी सकाळी साडे पाच वाजता येथील जयंतराव पाटील खुले नाटयगृह येथे होणार आहे. या स्पर्धेची ऑनलाईन नावनोंदणी दि.१० डिसेंबर पर्यंत सुरु असणार आहे. यावर्षी महिलांनाही यामध्ये सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन
जलसंपदा मंत्री जयंत पाटील व युवानेते प्रतिक पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, कर्ण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रविराज ताटे यांनी दिली.
ताटे पुढे म्हणाले, या स्पर्धा लहान व ओपन गटातून होणार आहेत. यामध्ये २१ कि.मी. १० किमी व ५ किमी अशा तीन प्रकारात होणार आहेत. या स्पर्धेत १० ते ४५ वयोगटात तर ओपन स्पर्धा ४५ वयोगटापासून पुढे असणार आहे. २१ कि. मी. गटातील पुरुष विजेत्यांना १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर १० कि.मी गटातील पुरुष विजेत्यांना ७ हजार, ५ हजार व ३ हजार रूपये अशी अनुक्रमे बक्षिसे दिली जाणार आहेत. ५ किमी गटातील पुरुष विजेत्यांना ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये अनुक्रमे बक्षिस ठेवण्यात आले आहे.

तर महिलांच्या २१ कि.मी गटातील विजेत्यांना ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये अशी अनुक्रमे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच १० कि.मी गटातील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये अशी अनुक्रमे बक्षिस देण्यात येणार आहे. ५ कि.मी गटातील विजेत्यांना ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये, अशी बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून टी शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, नाष्टा, एनर्जी ड्रिंक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी ५०० रुपये आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://tinyurl.com/karnmarathon2022 या लिंक वर नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. १० डिसेंबर पर्यंत असणार आहे. तर जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कर्ण प्रतिष्ठाणच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी कर्ण प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक व राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष अंकुश मस्के, सचिव अभिजीत साळुंखे, सदस्य बिपीन राजमाने, सुशांत मोरे, सुशांत पाटील, अमित साळुंखे, रोहित पाटील, विवेक शेटे, रणजित घोरपडे, उमाकांत कापसे, धनंजय देशपांडे, अतुल जाधव उपस्थित होते.

Related Stories

अर्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे वस्त्रोद्योग साखळीतून नाराजी

Archana Banage

शिवसेना शिराळा तालुका प्रमुख संतोष हिरूगडे यांचा राजीनामा

Archana Banage

सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’

Archana Banage

सांगली : पुजारवाडी येथे वीज पडून बैल ठार

Archana Banage

मिरज पंचायत समितीवर सोमवारपासून प्रशासक राज

Abhijeet Khandekar

सांगली : कुटे वस्ती पाझर तलाव धोकादायक स्थितीत

Archana Banage