Tarun Bharat

कर्तव्यदक्ष पोलीस पाटील… सुनीता रविराज पाटील

Advertisements

सरिता घारे / कोयना वसाहत :

कराड तालुक्यातील एक संवेदनशील व सर्वच क्षेत्रात जागृत व अग्रेसर असलेल्या आणि श्री जोतिर्लिंगसारखे जागृत देवस्थान असलेल्या आणे (ता. कराड) या गावच्या पोलीस पाटील म्हणून सुनीता रविराज पाटील यांनी आपला ठसा उमटवला आहे.
सामाजिक, शैक्षणिक वारसा जोपासलेल्या आणे येथील पाटील कुटुंबात सुनीता या सून म्हणून आल्या. या कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत आदर्श शिक्षक स्व. नारायणराव पाटील अण्णा यांच्यामुळे सर्वश्रुत आहे. सुनीता याही उच्चशिक्षित असून आणे गावच्या पोलीस पाटील म्हणून त्या रुजू झाल्या. समाजसेवेची आवड, अतिशय मनमिळाऊ स्वभाव, मृदूसंभाषण कौशल्याच्या जोरावर गावामध्ये एक आदर्श पोलीस पाटील म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. त्याचबरोबर आदर्श सून, पत्नी, आई, समाजसेविका अशा अनेक भूमिका अतिशय सहजपणे व प्रभावीपणे पार पाडत आहेत.

या कुटुंबाला पूर्वीपासून पोलीस पाटील पदाचा वारसा आहे. स्वर्गीय मारूतराव पाटील व स्वर्गीय खाशाबा बापू पाटील यांच्याकडे ब्रिटीश कालखंडापासून पोलीस पाटील पद होते. हा कुटुंबाचा वारसा त्या पुढे नेटाने चालवत आहेत. त्यांना त्याचे पती रविराज, सासू नंदाताई पाटील, सासरे, निवृत्त प्राध्यापक उत्तमराव नारायण पाटील यांची मोलाची मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे. पती प्राध्यापक रविराज उत्तमराव पाटील तेही उत्तम वक्ता आणि भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. त्याचे सासरे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्याचे मोठे दीर चंद्रकांत उत्तमराव पाटील हे जालना येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जाऊबाई सारिका चंद्रकांत पाटील या भोकरदन जि. जालना येथे तहसीलदार आहेत. त्यांचे दुसरे सासरे प्रकाशराव पाटील यांच्या व सासूबाई संगिता यांची मुलगी अनुराधा यांची 2021 मध्ये पी. एस.आय. पदी निवड झाली आहे. व दीर श्रीकांत पाटील हे सिव्हील इंजिनिअर आहेत. अशा या एकाच उच्चशिक्षित कुटुंबात उत्तम शेतकरी, शिक्षक, इंजिनिअर आणि एमपीएससी परीक्षेतून निवड झालेले अधिकारी असलेल्या कुटुंबातील सरळ सेवा परीक्षा प्रक्रियेतून एप्रिल 2016 मध्ये त्यांची निवड झाली. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन एप्रिल 2021 मध्ये 5 वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशाचे पहिले ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे गाव असणाऱ्या गोळेश्वर गावच्या सधन, उचशिक्षित आणि संस्कारी, माजी ग्रामपंचायत सदस्य हिंदुराव पवार यांच्या त्या कन्या असून गोळेश्वर दूध संघाचे अध्यक्ष आनंदराव पवार यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांना आई, वडील, भाऊ आणि बहिणीचे नेहमीच सहकार्य लाभले आहे.

कार्याविषयी
आणे गावामध्ये 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये पोलीस पाटील यांनी स्वत:च्या मानधनातून 25 कुटुंबांना अडचणीच्या वेळी मदत केली. या कुटुंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची छोटीशी मदत दिली.
कोरोनाच्या काळात लसीकरण, संचारबंदी, मास्कबंदीसह गावांमध्ये कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी काम केले. ऑगस्ट 2021 रोजी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची दखल म्हणून कराड तालुका पोलीस स्टेशनचया वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्य दिन आणि महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये स्वत: रक्तदान करून गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
या कार्यासाठी प्रांताधिकारी, महसूल व पोलीस विभाग, प्रशासन व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

आदर्श शिक्षिका बनण्याचे ध्येय

सुनीता यांचे शिक्षण एम. ए., बी. एड. पर्यंतचे शिक्षण कराडच्या महिला महाविद्यालय, सगाम महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर येथे झाले आहे. आदर्श शिक्षिका व आदर्श आई बनण्याचे ध्येय आहे. कुटुंबाचा वारसा जपत समाजसेवेचा वसा पुढे न्यायचा आहे.

Related Stories

बीपी,शुगरअसणाऱ्या आशा सेविका कोरोना सर्व्हेत

Archana Banage

सवलतीने अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे

Archana Banage

सातारा : खंडणीप्रकरणात वनविभागाच्याच आणखी दोन कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न

Archana Banage

“कोण म्हणते देत नाय,आमच्याच नावाचा सातबारा हातात घेतल्याशिवाय उठणार नाय”

Archana Banage

‘युवकांच्या केसालाही धक्का लावू नका’

Patil_p

दोन ठिकाणी घरफोडी सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Patil_p
error: Content is protected !!