Tarun Bharat

कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे दिव्यांगांना सायकल वाटप

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

येथील कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे सातारा शहर आणि परिसरातील सात अपंग व्यक्तींना नवीन तीनचाकी सायकल आणि व्हील चेअरचे वाटप ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, कर्तव्य सोशल ग‘gपचे सदस्य विलास कासार, सुहास ओहाळकर, महेश यादव, डी. पी. शेख, रवी पवार, सुनिल भोसले, ओंकार परदेशी, चंदन घोडके आदी उपस्थित होते.  

पर्यावरण, निसर्ग रक्षणाबरोबरच जनसामान्यांची सेवा करण्याचे काम कर्तव्यच्या माध्यामातून अविरतपणे सुरु आहे. मोतीबिंदू शिबीर असेल, मोफत जयपूर ङ्गूट वाटप शिबीर असेल किंवा तीनचाकी सायकल आणि व्हील चेअर वाटप अशा विविध प्रकाराच्या आरोग्य विषयक शिबीरातून पिडीत लोकांना आपले जीवन आनंदाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले जातात.

यावेळी अनिल नरहर साठे (रामाचा गोट), बाळू त्रिंबक ओव्हाळ (प्रतापसिंहरनगर), दुर्योधन श्रीरंग बाबर (रा. गोडोली), रविंद्र बबन बोर्डे (मंगळवार पेठ), ओमकार हणमंत भिसे (मंगळवार पेठ), संजय देवरे (सायळी ता. जावली) अणि लक्ष्मण भिमराव मुळीक (मंगळवार पेठ) या दिव्यांग बांधवांना मोफत तीनचाकी सायकल, व्हील चेअर भेट देण्यात आली. लाभार्थी दिव्यांग बांधवांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

 

Related Stories

कपिलेश्वर मंदिरात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Patil_p

दौडमधून मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन

Amit Kulkarni

गायकवाडी येथे अपघातात शिरगुप्पीचा युवक ठार

Patil_p

यल्लम्मा डोंगरावर चार लाखाहून अधिक भाविक

Patil_p

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा मुले जखमी

Amit Kulkarni

अखिल भारतीय ढोर कक्कय्या महिला मंडळाची बैठक

Amit Kulkarni
error: Content is protected !!