बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे. त्याचबरोबर राज्यात रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण वाढत आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे म्हंटले आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सतत सुधारत आहे. असे मंत्री सुधाकर यांनी म्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनी आजपर्यंत कर्नाटकातील रिकव्हरी दर ५४.३६ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १०० प्रयोगशाळांमध्ये १७,२९,०६७ चाचण्या घेतल्या असल्याचे म्हंटले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सोमवारी केवळ ३२,९८५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, तर ४ ऑगस्ट रोजी ४२,४५८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. याबाबत अद्याप आरोग्य विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.


previous post