Tarun Bharat

कर्नाटकः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) / बॅलेट बॉक्स हाताळण्यासाठी हातमोज्यांचा वापर करण्यापासून ते तालुका मुख्यालयातील अनेक मस्टरिंग सेंटर ओळखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश असणार आहेत, कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने (केएसईसी) मंगळवारी पुढील कार्यवाही करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जारी केले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग्य ती खबरदारी घेऊन घेण्यात येणार आहेत.

निवडणुकांशी संबंधित कोणत्याही कामात भाग सहभागी हिणाऱ्या प्रत्येकासाठी फेस मास्क घालणे अनिवार्य आहे, सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे की प्रत्येकव्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल आणि खोल्या, सभागृह किंवा आवारात प्रवेश केल्यावर साबण / सॅनिटायझर वापरला जाईल.

Related Stories

ड्रग रॅकेट : दोन चित्रपट कलाकारांची चौकशी, तर एका तस्कराला अटक

Archana Banage

‘सारथी’ ला मिळतंय आर्थिक बळ

Archana Banage

बारावीची परीक्षा रद्द तर दहावीची जुलैमध्ये

Patil_p

मृत्यांच्या कुटुंबीयांना विमा मंजुरीचा आदेश

Amit Kulkarni

खाते वाटपावरून मंत्री आनंद सिंह यांनी दिली राजीनाम्याची धमकी

Archana Banage

कर्नाटक: शेतकरी १८ फेब्रुवारी रोजी ३ तास रेल्वे रोको करणार

Archana Banage