Tarun Bharat

कर्नाटकचे पर्यटन मंत्री सी. टी. रवी यांना कोरोनाची लागण

Advertisements

प्रतिनिधी / बेंगळूर

महामारी कोरोनाच्या विळख्यात अनेक लोकप्रतिनिधी देखील सापडत आहेत. आतापर्यंत अनेक आमदारांना कोरोना संसर्ग झाला आहे. आता त्यामध्ये पर्यटन मंत्री सी. टी. रवी यांची भर पडली आहे. कोरोनाची बाधा होणारे ते कर्नाटकातील पहिले मंत्री आहेत.

शनिवारी सी. टी. रवी यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. आपण सुखरुप आहे. सध्या आपण फार्महाऊसमध्ये होम क्वारंटाईन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. अलिकडेच माजी केंद्रीय मंत्री जनार्दन पुजारी, खासदार सुमलता अंबरिश, विधानपरिषद सदस्य पुट्टण्णा, एम. के. प्राणेश, आमदार डॉ. रंगनाथ, शरत बच्चेगौडा, टी. डी. राजेगौडा, अजय सिंग, प्रसाद अब्बय्या यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती.

Related Stories

‘प्राणवायू’अभावी 25 रुग्णांचा गेला प्राण

Patil_p

नितीश कुमार आरोपमुक्त

Patil_p

सायकलचा अपमान हा देशाचा अपमान : अखिलेश यादव

Sumit Tambekar

देशात रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर

Amit Kulkarni

केरळमधील माकप नेत्यांवर गंभीर आरोप

Patil_p

कुख्यात गुंड विकास दुबेला मध्यप्रदेशच्या उज्जैनमधून अटक

Rohan_P
error: Content is protected !!