बेंगळूर : कर्नाटकचे वनमंत्री व बळ्ळारी जिल्हय़ाचे पालकमंत्री आनंद सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी शुक्रवारी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. या अहवालातून आनंद सिंग कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना संसर्ग होऊनही त्यांच्यात अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे ते घरीच राहणार असून त्यांच्यावर हॉस्पेट येथील निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. मंत्री सिंग यांनी स्वेच्छेने कोरोना चाचणी करून घेतली होती.

